शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अरे व्वा! आता तुमच्या पोस्टवर कोणी कमेंट करायची हे तुम्हीच ठरवा; Facebook ने आणलं जबरदस्त फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 1:53 PM

1 / 17
फेसबुक आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. आता फेसबुक युजर्ससाठी एक खूशखबर आहे. कारण फेसबुकने आणखी एक भन्नाट फीचर लाँच केलं आहे.
2 / 17
फेसबुकवर अनेकदा एखादी पब्लिक पोस्ट केल्यानंतर खूप जण त्यावर कमेंट करतात. त्यामध्ये काही असे लोक असतात, ज्यांनी कमेंट केलेलं आपल्याला अजिबात आवडत नाही. मग तेव्हा आपण अशा लोकांना सरळ ब्लॉक करतो.
3 / 17
युजरची ही समस्या आता फेसबुक लवकरच दूर करणार आहे. मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांची सोशल मीडिया कंपनी फेसबुक लवकरच असं नवीन फीचर आणणार आहे, ज्यामध्ये युजर्स आपल्या पब्लिक पोस्टबाबत निर्णय घेऊ शकणार आहेत.
4 / 17
आपल्या पोस्टवर कोणत्या व्यक्तीने कमेंट करावी आणि कोणी करू नये हे आता युजर्सना ठरवता येणार आहे. तसेच फेसबुक युजर्सला फीड फिल्टर बारचा उपयोग करुन आपल्या न्यूज फीड सॉर्ट करण्याचा आणि ब्राउज करण्याचाही पर्याय मिळेल.
5 / 17
फेसबुक नेहमीच नवनवीन फीचर्स आणून युजर्सचा आनंद द्विगुणित करत असतं. आता ही नव्या फीचरचा युजर्सना खूप फायदा होणार आहे. या टुलच्या वापर नेमका कसा करायचा हे जाणून घेऊया....
6 / 17
फेसबुक एक न्यूज फीड फिल्टर बार आणणार आहे. जो न्यूज फीडमध्ये दिसेल. ज्यात युजरला लेटेस्ट न्यूज फीड पाहणं आधी पसंत आहे, की रॅकिंगच्या हिशोबाने न्यूज फीड पाहणं पसंत असेल हा पर्याय मिळेल.
7 / 17
Who Can Follow Me वर जा आणि येथे Public सिलेक्टेड आहे का हे तपासा. त्यानंतर Public Post Comments वर क्लिक करा.
8 / 17
युजरने येथे कोणाला कमेंट करण्यासाठी परवानगी द्यावी ते ठरवायाचं आहे. या सेटिंगनंतर तुम्ही परवानगी दिलेल्या लोकांनाच तुमच्या पब्लिक पोस्टवर कमेंट करता येईल.
9 / 17
न्यूज फीड सॉर्ट करण्यासाठी आणि ब्राउजिंग सहन करण्यासाठी फेसबुकचं फीचर आहे. यात Favourites चा पर्याय मिळेल, ज्यात युजर 30 फ्रेंड्स आणि न्यूज फीड सिलेक्ट करू शकतील, ज्या टॉपवर दिसतील.
10 / 17
फेसबुक एक न्यूज फीड फिल्टर बार आणणार आहे. जो न्यूज फीडमध्ये दिसेल. ज्यात युजरला लेटेस्ट न्यूज फीड पाहणं आधी पसंत आहे, की रॅकिंगच्या हिशोबाने न्यूज फीड पाहणं पसंत असेल हा पर्याय मिळेल.
11 / 17
अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्स फेसबुक App ला ओपन करुन फीड फिल्टर बारला एक्सेस करू शकतील, ज्यावेळी ते न्यूज फीड स्क्रोल करतील. मात्र आयओएस युजर्ससाठी हे फीचर सध्या उपलब्ध नाही.
12 / 17
फेसबुककडून आयफोन युजर्ससाठी येणाऱ्या काही दिवसांत हे फीचर उपलब्ध होईल असं सांगण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
13 / 17
फेसबुकवर आता टिकटॉकसारख्या शॉर्ट व्हिडीओची मजा घेता येणार आहे. जगभरातील सर्वात मोठी सोशल मीडिया वेबसाईट असलेल्या फेसबुकने आता फेसबुक रील्स (Facebook Reels) फीचर अधिकृतपणे लाँच केलं आहे.
14 / 17
नव्या फीचरची सुरुवात ही भारतापासून करण्यात आली आहे. गेल्या वर्षापासून या फीचरचं टेस्टिंग केलं जात होतं. तसेच फेसबुकने काही इन्स्टाग्राम क्रिएटर्सला आपली रील्स थेट फेसबुकवर शेयर करण्याची सुविधा मिळणार असल्याचं म्हटलं होतं.
15 / 17
फेसबुकने टिकटॉक सारखे छोटे व्हिडीओजला रील्स नाव दिलं आहे. फेसबुक रील्स एकदम Instagram Reels सारखे आहे. या फीचरद्वारे युजर्स काही सेकंदाचे व्हिडीओज बनवून ते शेअर करू शकतील. हे व्हिडिओज न्यूज फीडमध्ये दिसतील.
16 / 17
युजर्स फेसबुक म्यूझिक लायब्रेरीमधून कोणतेही साँग सिलेक्ट करू शकतील. वेगवेगळे व्हिडीओ बनवून ते वेगवेगवळे इफेक्ट देऊन एक टाइमर सेट करू शकतील. यात व्हिडीओचा स्पीड हा कमी जास्त करता येतो.
17 / 17
कंपनी फेसबुक आणि इन्स्टाग्राम रील्सला सध्या वेगवेगळं ठेवणार आहे. फेसबुक रील्सला फक्त फेसबुक न्यूज फीडवर शेअर करण्याचा पर्याय दिला आहे. याचपद्धतीने इन्स्टाग्राम रील्स त्या Appवर शेअर करू शकतील.
टॅग्स :Facebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञानMark Zuckerbergमार्क झुकेरबर्ग