now you can get list of plasma donors on aarogya setu app and to help build a database
CoronaVirus: मस्तच! आता ‘आरोग्य सेतु’वर मिळणार प्लाझ्मा डोनरची लिस्ट; पाहा, डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 7:20 PM1 / 10देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असली, तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. 2 / 10परंतु, कोरोना मृत्यूचे वाढणारे प्रमाण चिंताजनक आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा तुडवडा अद्यापही जाणवत आहे.3 / 10कोरोनावरील एक प्रभावी उपचार पद्धती म्हणून प्लाझ्मा थेअरीकडे पाहिले जाते. कोरोनामुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन आवर्जुन केले जात आहे. (arogya setu app)4 / 10केंद्र सरकारने गेल्या वर्षी कोरोनाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप म्हणून आरोग्य सेतू अॅपला लाँच केले होते. याचा वापर आता लसची माहिती देण्यासाठी केला जात आहे. मात्र, लवकरच आरोग्य सेतु अॅपवर प्लाझ्मा डोनरची लिस्ट दिली जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. 5 / 10ज्या लोकांना प्लाझ्मा हवा आहे, त्यांना या ठिकाणी डोनरची यादी पाहायला मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. एका रिपोर्टनुसार, आरोग्य सेतु अॅपला लवकर करोनातून बरे झालेल्या लोकांचा एक डेटा बेस तयार केला जाणार आहे.6 / 10हा डेटा प्लाझ्मा डोनरसाठी असेल. प्लाझ्मा डोनेशनसाठी कोणावरही दबाव टाकला जाणार नाही. जर या यादीतील कोणी स्वेच्छेने प्लाझ्मा डोनेट करणार असेल, तर आरोग्य सेतू अॅपद्वारे सरकारला यासंबंधी माहिती देऊ शकतो.7 / 10केंद्र सरकारकडून यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आले नाही. तसेच प्लाझ्मा डोनेशन डाटाबेस फीचरचे अपडेट समोर आल्याची कोणतीही तारीख स्पष्ट करण्यात आली नाही. मात्र, लवकरच याचा एक अपडेट येणार असल्याचे सांगितले जात आहे. 8 / 10आरोग्य सेतु अॅप मध्ये अनेक फीचर्स जोडले गेले आहेत. यातआता लस साठी सेंटर पर्यंत पासून रजिस्ट्रेशन पर्यंत सर्व माहिती मिळू शकते. (list of plasma donors)9 / 10आरोग्य सेतु अॅपवरून रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकतात. यात कोविन पोर्टलचे एक टॅब जोडले आहे. कोविन पोर्टलवर होणारी सर्व कामे तुम्ही या अॅपवर करू शकता.10 / 10कोरोनाच्या कहर कायम असताना अशा प्रकारचा येणारा अपडेट दिलासादायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. मात्र, प्लाझ्मा थेअरीबाबतही तज्ज्ञांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications