Now you can search chats by date on WhatsApp; The company will release this feature soon!
आता तुम्ही WhatsApp वर तारखेनुसार चॅट शोधू शकाल; कंपनी लवकरच 'हे' फीचर जारी करणार! By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 12:47 PM1 / 8अधिकाधिक युजर्स जोडण्यासाठी व्हॉट्सअॅप नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स जारी करत आहे. यानुसार आता कंपनी एका शानदार फीचरवर काम करत आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp यूजर्सना कोणताही मेसेज सहज शोधण्याचा एक नवीन ऑप्शन देणार आहे. जाणून घेऊया काय आहे, हे नवीन फीचर...2 / 8रिपोर्टनुसार, या फीचर अंतर्गत, कंपनी यूजर्सला चॅटवर तारखेनुसार मेसेज शोधण्याचा ऑप्शन देईल. हे फीचर पहिल्यांदा 2020 मध्ये दिसून आले होते, परंतु नंतर ते बंद करण्यात आले. मात्र आता पुन्हा एकदा त्यावर काम सुरू आहे. लवकरच हे फीचर नवीन अपडेटमध्ये जोडले जाणार असल्याची चर्चा आहे.3 / 8युजर्सना या फीचरचा खूप फायदा होणार आहे. समजा एखादा युजर मित्रासोबतच्या चॅटिंगच्या महत्त्वाच्या गोष्टी विसरला असेल, पण त्याला चॅटच्या दिवसाची तारीख आठवत असेल, तर तो चॅट सर्चमध्ये फक्त तारीख टाकून तो मेसेज सहज शोधू शकतो. यामुळे जुने मेसेज शोधण्यासाठी त्याला सर्व मेसेज स्क्रोल करून वाचावे लागणार नाहीत.4 / 8या फीचरचा फायदा ग्रुप मेसेजमध्ये जास्त होईल. कारण कोणत्याही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सदस्यांची संख्या जास्त असते आणि चॅट्सही तिथे रोज जास्त जमा होतात. अशात 10-15 दिवस जुने मेसेज शोधण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. अशा परिस्थितीत हे आगामी फीचर अतिशय उपयुक्त ठरेल आणि युजर्स फक्त तारीख टाकून मेसेज शोधू शकतील.5 / 8रिपोर्ट्सनुसार, मेटा-मालकीचे व्हॉट्सअॅप सध्या आयफोन युजर्ससाठी हे फीचर जारी करण्याची तयारी करत आहे. iOS वर लाँच झाल्यानंतर काही दिवसांनी ते अँड्रॉइड युजर्ससाठी देखील लाँच केले जाईल. या फीचरची चाचणी सध्या सुरू आहे. त्याचे लाँचिंग अद्याप झालेले नाही.6 / 8WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे फीचर दोन वर्षांपासून प्रोसेसमध्ये होते, परंतु नंतर कंपनीने ते बंद केले आणि त्याची टेस्टिंग थांबविली. मात्र टेस्टफ्लाइट वरून iOS 22.0.19.73 साठी व्हॉट्सअॅप बीटा रिलीज झाल्यानंतर हे आढळून आले की, व्हॉट्सअॅप भविष्यात हे फीचर पुन्हा रिलीझ करण्यावर काम करत आहे.7 / 8WABetaInfo ने या फीचरला 'Search message by Date' असे नाव दिले आहे. हे फीचर सध्या डेव्हलपमेंट स्टेजवर असल्याचे देखील कळले आहे आणि आगामी अपडेट्समध्ये ते लवकरच सादर केले जाईल अशी अपेक्षा आहे.8 / 8हे फीचर कसे काम करते याबद्दल सांगायचे तर, ज्याचा मेसेज तुम्हाला शोधायचा आहे, यासाठी तुम्हाला सर्वात आधी त्या व्यक्ती किंवा ग्रुपवर क्लिक करावे लागेल. आता सर्च ऑप्शनवर जाऊन डेट फॉर्मेटला सेलेक्ट करा. त्यानंतर एंटर किंवा सर्च या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर आता तुम्हाला काही सेकंदांनंतर हवे असलेले चॅट मिळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications