paytm spoof app scam how it works and how to save yourself
Paytm Spoof Scam: Paytm वापरता? मग सावधान! अशी होऊ शकते तुमची फसवणूक; वाचा... By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 7:27 PM1 / 11Paytm हे लोकप्रिय डिजिटल पेमेंट अॅप असून देशात Paytm चे कोट्यवधी युझर्स आहेत. सध्या Paytm Spoof नावानं सध्या युजर्सला गंडा घालता जातो आहे. Paytm Spoof हे एक फ्रॉड अॅप असून यामाध्यमातून ग्राहकांना फसवण्याचं काम केलं जात आहे. 2 / 11मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत Paytm Spoof अॅप दिसून येत आहे. हे अॅप नेमकं कसं काम करतं याची माहिती यात देण्यात आली आहे. 3 / 11सायबर गुन्हेगारांनी या अॅपचा वापर खासकरुन दुकानदारांना फसवण्यासाठी केला जात आहे. दुकानदारांसोबतच सामान्य ग्राहकांनाही यातून फसवलं जाऊ शकतं. 4 / 11पेटीएमच्या अधिकृत अॅपसारखंच हे फेक अॅप दिसतं. त्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडतो. फेक अॅप देखील खऱ्याखुऱ्या अॅपप्रमाणेच काम करतं. उदाहरणार्थ: जेव्हा तुम्ही एखाद्याला पेटीएमच्या माध्यमातून पैसे पाठवता तेव्हा पेमेंट यशस्वी झाल्यावर पैसे पाठवणाऱ्याच्या होम स्क्रीनवर त्यानं केलेल्या व्यवहाराशी निगडीत संपूर्ण माहिती दिसते. यात किती पैसे पाठवले?, ट्रान्झाक्सन आयडी आणि इतर माहिती दिसते. 5 / 11पेटीएमध्ये ज्यापद्धतीनं पैसे पाठवल्यानंतर स्क्रिनवर मेसेज येतो त्याचपद्धतीचा मेसेज या फेक अॅपवरही दिसून येते. पेटीएमचं हे स्पूफ अॅप सध्या खूप व्हायरल झालं आहे. 6 / 11या अॅपची काम करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचा नंबर नमूद करावा लागतो. त्यानंतर त्याचं नाव नमूद करावं लागतं आणि किती पैसे पाठवायचे आहेत त्याची माहिती भरावी लागते. यात वेळ आणि तारीख देखील नमूद करावी लागते. 7 / 11सर्व माहिती सबमिट केल्यांतर पेटीएम ट्रान्झाक्शनचं एक फेक अॅनिमेशन तयार होतं. ही स्क्रीन दुकानदाराला दाखवली की समोरच्या व्यक्तीला व्यवहार यशस्वी झाल्यानं तो आश्वस्थ होतो. पण मूळात व्यवहार पूर्ण झालेलाच नसतो. आता अशापद्धतीच्या फ्रॉडमुळे दुकानदारांना अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. 8 / 11Paytm Spoof अॅप खरंतर अगदीच Paytm च्या अधिकृत अॅपसारखं दिसत नाही. पण त्यात संपूर्ण माहिती नमूद करण्याची पद्धत आणि त्यानंतर दिसणारा मेसेज व स्क्रिन अगदी पेटीएम सारखीच तयार करण्यात आली आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा घोळ होऊ शकतो. 9 / 11जर तुम्ही दुकानदार असाल आणि ग्राहकांकडून पेटीएमनं पैसे स्वीकारत असाल तर सतर्क राहणं गरजेचं आहे. अशावेळी तुम्ही दुकानात पेटीएम डिव्हाईस Soundbox 2.0 वापरू शकता. हे डिव्हाइस म्हणजे एक स्पिकर असतो. यात पेटीएमवर होणाऱ्या प्रत्येक व्यवहारानंतर तुम्हाला पैसे प्राप्त झाले का आणि किती पैसे प्राप्त झाले याची तात्काळ माहिती देतं. 10 / 11या डिव्हाइसमध्ये एक छोटी स्क्रिन देखील असते. यात तुम्हाला पैसे प्राप्त झाले आहेत का याची सविस्तर माहिती मिळते. यात संपूर्ण दिवसभरात झालेल्या व्यवहारांचीही माहिती मिळते. डिव्हाइसवर काही बटणं देखील देण्यात आली आहेत. त्यांचा वापर करुन तुम्ही आवश्यक अशी सर्व माहिती मिळवू शकता. 11 / 11तुमच्याकडे हे डिव्हाइस नसेल तर किमान प्रत्येक व्यवहारानंतर तुमच्या अधिकृत मोबाइल क्रमांकावर येणारा मेसेज काळजीपूर्वक तपासणं आणि पडताळणी करणं गरजेचं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications