शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रोडक्टची सत्यता पडताळण्यासाठी 'हे' सरकारी अ‍ॅप करणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 5:50 PM

1 / 7
दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टींची खरेदी करत असतो. वस्तूंची खरेदी करताना मॅन्युफॅक्चरिंग, एक्सपायरी डेट, किंमत यासह अनेक गोष्टी या चेक केल्या जातात. मात्र नकली वस्तू देखील विक्रीसाठी उपलब्ध असतात. आता प्रोडक्ट खरं आहे की खोटं सांगणारं सरकारी अ‍ॅप आलं आहे. या अ‍ॅपच्या मदतीने कसं ओळखायचं हे जाणून घेऊया.
2 / 7
GS1 द्वारा तयार करण्यात आलेले स्मार्ट कंज्यूमर अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयओएसवरून डाऊनलोड करा. अ‍ॅपच्या मदतीने प्रोडक्टवर देण्यात आलेला बारकोड स्कॅन केला जातो.
3 / 7
अनेकदा प्रोडक्टवर देण्यात आलेलं बारकोड स्कॅनिंग फेल होतं. असं झाल्यास त्यावर देण्यात आलेला प्रोडक्टचा GTIN नंबर एंटर करा. स्कॅनिंग केल्यानंतर त्या प्रोडक्ट संदर्भातील सर्व माहिती ही स्क्रीनवर येईल.  
4 / 7
मॅन्युफॅक्चररसोबत प्रोडक्टची किंमत, FSSAI लायसेन्स आणि त्याबाबतची इतर माहिती लगेचच मिळेल. स्कॅनिंग केल्यानंतर प्रोडक्टची माहिती समोर आली नाही तर ते प्रोडक्ट नकली आहे हे समजा. 
5 / 7
प्रोडक्ट खरंच नकली आहे का हे ओळखण्यासाठी त्याच दुकानातून प्रोडक्टचं दुसरं सॅम्पल चेक करा. जर त्याने सर्व तपशील दिले तर पहिलं प्रोडक्ट खोटं होतं हे समजा. 
6 / 7
एखाद्या प्रोडक्टचं पॅकेजिंग आणि स्टीकर खराब झालं असलं तरी या अ‍ॅपच्या मदतीने प्रोडक्टची किंमत आणि इतर माहिती मिळेल. 
7 / 7
एखादं प्रोडक्ट नकली असेल तर ग्राहक त्या विरोधात तक्रार करू शकतात. 
टॅग्स :technologyतंत्रज्ञान