things happen on internet in one minute
एका मिनिटात इंटरनेटवर घडतं बरंच काही, जाणून घ्या कसं By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 01:58 PM2019-06-10T13:58:28+5:302019-06-10T14:09:44+5:30Join usJoin usNext एक मिनिटं म्हणजे 60 सेकंद. फक्त एका मिनिटात खूप काही होऊ शकतं. इंटरनेटवर एका मिनिटात तब्बल 18 कोटी ई-मेल पाठवले जातात. तर 10 लाख लोक 1 मिनिटात लॉग इन करतात. अशाच काही गोष्टी जाणून घेऊया. ई-मेल इंटरनेटवर जगभरात एका मिनिटात तब्बल 18 कोटी 80 लाख ई-मेल पाठवले जातात. मोबाईल मेसेज जगभरात अवघ्या एका मिनिटात 4 कोटी 16 लाख मोबाईल मेसेज पाठवले जातात. फेसबुक फेसबुक लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. फेसबुकवर 10 लाख लोक 1 मिनिटात लॉग इन करतात.यूट्यूब यूट्यूबवर व्हिडीओ पाहणं युजर्सना आवडतं. एका मिनिटात 45 लाख व्हिडीओ पाहिले जातात. गुगल गुगलवर सर्च केल्यास युजर्सना सर्व माहिती मिळते. गुगलवर फक्त एका मिनिटात 38 लाख सर्च क्वेरी येत असतात. स्नॅपचॅट स्नॅपचॅटवर अनेक युजर्स व्हिडीओ बनवत असतात. जगभरात स्नॅपचॅटवर एका मिनिटात 21 लाख स्नॅप्स क्रिएट होतात. टिंडर टिंडर जगातील सर्वात लोकप्रिय डेटिंग अॅप आहे. एका मिनिटात टिंडरमध्ये 14 लाख स्वाईप होतात. खर्च अनेकजण ऑनलाईन शॉपिंग करण्याला अधिक प्राधान्य देतात. जगभरात एका मिनिटात जवळपास 9,56,956 डॉलर खर्च केले जातात. अॅप डाऊनलोड फक्त एका मिनिटात जगभरात 3,90,030 अॅप डाऊनलोड होतात. टॅग्स :इंटरनेटतंत्रज्ञानफेसबुकयु ट्यूबगुगलमोबाइलInternettechnologyFacebookYouTubegoogleMobile