upi alert upi fraud upi customer care number upi payment and transaction limit Payment alert
UPI पेमेंट करताना राहा सतर्क, थोडासा निष्काळजीपणा तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 12:59 PM1 / 9भारतात ऑनलाइन किंवा डिजिटल व्यवहार अनेक पटींनी वाढले आहेत आणि ही वाढ सुरूच आहे. ऑनलाइन पेमेंट इतकं सोपं झालंय की आता लोक चहाच्या दुकानात पाच रुपयेही ऑनलाइन भरतात. ऑनलाइन पेमेंट करणे जितके सोपे आहे, तितकेच त्यात सतर्क राहण्याचीही गरज आहे. कारण थोडासाही निष्काळजीपणा तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो.2 / 9सध्याच्या परिस्थितीत तुमचा मोबाईल फोन हा तुमचे वॉलेट आणि बँक खाते आहे. त्यामुळे व्यवहारादरम्यान थोडासा निष्काळजीपणा झाला तरी तुम्ही सहज सायबर फसवणूक होऊ शकते. त्यामुळे मोबाईल अॅप वापरताना सतर्क राहणे आणि सुरक्षेशी संबंधित उपायांचे पालन करणे आवश्यक आहे.3 / 9सायबर फसवणूक टाळण्यासाठी तुमचा UPI अॅड्रेस कधीही कोणाशीही शेअर करू नका. तुमचा UPI अॅड्रेस तुमचा फोन नंबर, क्यूआर कोड किंवा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA) मधील काहीही असू शकतो. तुम्ही कोणत्याही पेमेंट किंवा बँक अॅप्लिकेशनद्वारे कोणालाही तुमच्या UPI अकाउंटमध्ये जाण्यास परवानगी दिली नाही पाहिजे. 4 / 9अनेक वेळा लोकांना फोन येतात की, ते बँक किंवा पेमेंट अॅप कंपनीशी बोलत आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या डिजिटल व्यवहारांशी संबंधित माहिती विचारतात. मात्र, त्यांच्यासोबत अजिबात कोणती माहिती शेअर करू नका, कारण हे कॉल फसवे असतात.5 / 9लोक अनेकदा ही चूक करतात की, पेमेंटसाठी वापरत असलेले अॅप अपडेट करत नाहीत. मोबाईल अॅप अपडेट करत राहणे महत्त्वाचे आहे. UPI पेमेंट अॅपसह प्रत्येक अॅपला लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपग्रेड केले पाहिजे, कारण अॅप अपडेट्समुळे तुमचे अॅप अधिक सुरक्षित राहतात. अॅप्सना लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपग्रेड केल्याने तुमचे खाते सुरक्षित राहते.6 / 9डिजिटल पेमेंट किंवा व्यवहारांसाठी एकपेक्षा अधिक अॅप्स वापरू नका. कारण अनेक अॅप वापरताना चूक होण्यास वाव असतो. अॅपमध्ये काही समस्या असल्यास हेल्प सेंटरची मदत घ्या. याबाबतीत बाहेरच्या कोणाचीही मदत घेऊ नका.7 / 9विचार न करता कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. UPI स्कॅमचा वापर हॅकर्स युजर्संना अडकवण्यासाठी करतात. हॅकर्स लिंक शेअर करतात किंवा कॉल करतात आणि युजर्संना व्हेरिफिकेशनसाठी नवीन अॅप डाउनलोड करण्यास सांगतात. सध्या डिजिटल फिशिंगचा जमाना आहे. त्यासाठी सायबर चोरटे अनेक ट्रीक काढतात. 8 / 9तुम्हाला फसविण्यासाठी जाळे विणतात. त्यासाठी हॅकर नेहमीच दोन ट्रीक जास्त वापरतात. एक म्हणजे तुम्हाला अनव्हेरिफाईड लिंक (Unverified Link) अथवा फेक कॉल (Fake call) करतात. या लिंक एखाद्या बँकेशी, मोठ्या ब्रँडशी संबंधित सेकंतस्थळासारख्या समान दिसतात. मात्र त्या अधिकृत नसतात. 9 / 9तुम्ही अशा लिंकवर कधीही क्लिक करू नये किंवा पिन किंवा इतर कोणतीही माहिती कोणाशीही शेअर करू नये. बँका कधीही पिन, ओटीपी किंवा इतर कोणतेही वैयक्तिक माहिती विचारत नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications