शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vagina Chip: महिलांच्या प्रायव्हेट पार्टसाठी संशोधकांनी बनविली खास चिप; संक्रमणापासून वाचविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 2:31 PM

1 / 6
सायन्स आज खूप पुढे गेले आहे. कालपर्यंत कंडोम हे लैंगिक संक्रमण रोखण्यासाठी परिणामकारक शस्त्र होते. परंतू आता एक चिप महिलांना लैंगिक संक्रमणापासून दूर ठेवणार आहे.
2 / 6
लाईव्ह सायन्सच्या रिपोर्टनुसार २६ नोव्हेंबरला जर्नल माइक्रोबायममध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये वैज्ञानिकांनी सांगितले की, वेगवेगळ्या प्रकारचे सुक्ष्म जीव व्हजायनाला कशाप्रकारे प्रभावित करतात यावर संशोधन होणार आहे.
3 / 6
यासाठी एक चिप बनविण्यात आली आहे. ज्याद्वारे संशोधक वेगवेगळी औषधे आणि प्रोबायोटिक्स आतील वातावरण कसे बदलतात हे अभ्यासू शकणार आहेत. योनीच्या आत असलेल्या विविध सूक्ष्मजीवांचा समुदाय त्याच्या वातावरणावर कसा परिणाम करतो याचाही अभ्यास करू शकणार आहेत.
4 / 6
या संशोधनाचे सुरुवातीचे लेखक गौतम महाजन हे हार्वर्ड विद्यापीठाच्या वायस इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल इन्स्पायर्ड इंजिनीअरिंगचे माजी संशोधक आहेत. योनीच्या आतील वातावरण स्त्रीचे आरोग्य आणि रोग नियंत्रित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यासोबतच याचा प्रसूतीपूर्व आरोग्यावरही मोठा परिणाम होतो, असे त्यांनी म्हटले आहे.
5 / 6
आम्ही बनविलेली नवीन चिप होस्ट -मायक्रोबायोम परस्परसंवादाचा अभ्यास करण्यासाठी आणि संभाव्य प्रोबायोटिक उपचारांच्या विकासास गती देण्यासाठी एक चांगला मार्ग दिसणार आहे. ही चिप फायदा देणारे बॅक्टेरिया निर्माण करण्याचे काम करते.
6 / 6
द न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, ही चिप फक्त 1 इंच (2.54 सेमी) लांब आहे. या चिपमध्ये दोन महिलांनी दान केलेल्या पेशी वापरण्यात आल्या आहेत.
टॅग्स :womens healthस्त्रियांचे आरोग्यWomenमहिला