whatsapp disappearing message feature become change messages will disappear in 24 hours
WhatsApp वर स्टेटसप्रमाणे आता 24 तासांत मेसेज गायब होणार, लवकरच नवं फीचर येणार By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 3:47 PM1 / 15इन्संट मेसेजिंग अॅप WhatsApp चे जगभरात कोट्यवधी युजर्स आहे. आपल्या युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअॅप हे एक लोकप्रिय अॅप आहे. मोठ्या प्रमाणात याचा वापर हा केला जातो.2 / 15WhatsApp मध्ये आता लवकरच स्टेट्स प्रमाणे पाठवण्यात आलेले मेसेज 24 तासांत आपोआप गायब होणार आहेत. सध्या पाठवण्यात आलेले मेसेज सात दिवसांनंतर आपोआप गायब होतात. मात्र आता कंपनी यात बदल करणार आहे.3 / 15WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप iOS व्हर्जनमध्ये नवीन फीचरची टेस्टिंग केली जात आहे. या फीचर द्वारे पाठवण्यात आलेले मेसेज व्हॉट्सअॅपवर 24 तासांच्या आत गायब होणार आहेत.4 / 15सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. मात्र हे व्हॉट्सअॅपवर जो व्यक्ती मेसेज पाठवतो तो हे सर्व ठरवू शकणार आहे. या फीचरला इनेबल करायचे की नाही हे पूर्णपणे युजरवर अवलंबून असणार आहे. 5 / 15नव्या फीचरमध्ये 24 तासांसोबतच 7 दिवसांची सुविधा आधी प्रमाणे मिळत राहणार आहे. व्हॉट्सअॅपच्या डिसअपिरिंग मेसेज फीचरमध्ये सध्या 7 दिवसांची लिमिट दिली आहे. रिसिवर तुम्हाला मेसेज कॉपी सुद्धा करू शकता. 6 / 15कंपनीने हे फीचर पर्सनल चॅट आणि ग्रुप चॅट दोन्हीसाठी जारी करण्यात आले होते. रिपोर्ट्च्या माहितीनुसार, नवीन फीचर भविष्यात अपडेट केले जाऊ शकते. जे iOS आणि Android सह सर्व प्लॅटफॉर्मसाठी जारी केले जाणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 7 / 15भारतासह जगभरात व्हॉट्सॲपचे युजर्स आहेत. दिवसभरात या युजर्सकडून व्हॉट्सॲपचा यथेच्छ वापर होत असतो. व्हॉट्सॲपवर आलेला प्रत्येक मेसेज वाचण्याकडे युजर्सचा कल असतो. हे हेरूनच हॅकर्सनी फसवणुकीचा एक नवीन प्रकार आणला आहे. जाणून घेऊया...8 / 15व्हॉट्सॲपचा बॅकग्राऊंड रंग हिरवा आहे. हा रंग बदलून तो पिंक करायचे असेल तर व्हॉट्सॲप पिंक नावाची लिंक येते. हे व्हॉट्सॲपचे नवीन फीचर असल्याचा उल्लेखही या लिंकमध्ये असतो. अर्थातच ही लिंक क्लिक करण्याचा मोह वापरकर्त्याला होतो.9 / 15व्हॉट्सॲप पिंक ही लिंक क्लिक केली की युजर्सचा फोन हॅक होतो. सध्या सोशल मीडियावर हा मेसेज तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे युजर्सनी अशा मेसेज पासून अत्यंत सावध राहण गरजेचं आहे.10 / 15संपूर्ण फोन हॅक होतो. तुमचे काँटॅक्ट नंबर्स, फोटो, मेसेजेस, बँक डिटेल्स हे सगळे हॅकर्सला मिळेल. युजर्सची वैयक्तिक माहिती ही हॅकर्सला मिळते आणि ते त्याच्या जाळ्यात अडकतात.11 / 15युजर्सनी अशा कोणत्याही फेक लिंकला क्लिक न केलेलेच बरे. तसेच मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही एपीके वा तत्सम मोबाईल ॲप डाऊनलोड करू नये.12 / 15व्हॉट्सॲपने अशा प्रकारची कोणतीही लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नका. आम्ही असे कोणतेही फीचर लाँच केलेले नाही. तसेच ज्या युजर्सना अशा प्रकारची लिंक येईल, त्यांनी आमच्याकडे त्याचा रिपोर्ट पाठवावा असं म्हटलं आहे.13 / 15पिंक रंगाचं व्हॉट्सॲप या व्हायरल होणाऱ्या मेसेज आणि लिंकला भूलू नका असाच सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच कोणत्याही मेसेसची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका असं सांगण्यात येत आहे.14 / 15व्हॉट्सअॅपवर अनेकदा आपण एखादा फोटो, व्हिडीओ किंवा मेसेज हे स्टेटसला ठेवत असतो. अनेकदा इतरांनी ठेवलेले स्टेटस हे आपल्या प्रचंड आवडतात. खासकरून व्हिडीओबाबत हे हमखास होत असतं. मात्र ते व्हिडीओ 24 तासांनंतर निघून जातात आणि आपल्या ते आपल्या फोनमध्येही ठेवता येत नाहीत. मात्र आता व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे.15 / 15कोणत्याही थर्ड पार्टी App ची गरज न घेता आता WhatsApp व्हिडीओ स्टेटस सहज डाऊनलोड करता येणार आहे. व्हॉट्सअॅपवर स्टेटस कसं ठेवायचं हे सर्वांनाच माहीत आहे पण ते डाऊनलोड कसं करायचं हे फार कमी लोकांना माहीत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications