फेक न्यूजपासून वाचण्यासाठी WhatsApp ने आणलं खास फीचर, असं करा फॅक्ट चेक By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 08:47 PM 2020-05-06T20:47:55+5:30 2020-05-06T21:16:43+5:30
सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज, बातम्या, फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही लोक कोरोनासंदर्भातील बातम्या, व्हिडिओ, फोटो चुकीच्या पद्धतीने व्हायरल करत आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 49,000 हून अधिक झाला असून 1600 अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान घरबसल्या लोक सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह झाले असून त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज, बातम्या, फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही लोक कोरोनासंदर्भातील बातम्या, व्हिडिओ, फोटो चुकीच्या पद्धतीने व्हायरल करत आहेत.
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा वेळी अनेकदा फेक मेसेज हे खरे वाटतात. व्हायरल गोष्टींमागचं सत्य जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
व्हॉट्सअॅपचा वापर ही लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात केला जात असून व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे.
व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळी ही व्हॉट्सअॅपने फेक न्यूजला आळा घालण्यासाठी नवं फीचर आणलं आहे.
पॉयन्टर इंस्टीट्यूटच्या इंटरनेशनल फॅक्ट-चेकिंग नेटवर्क (IFCN)सोबत फेसबुकची मालकी असलेली कंपनी व्हॉट्सअॅपने भागीदारी केली आहे. IFCN ने व्हॉट्सअॅपवर आपला चॅटबॉट लाँच केला आहे.
+1 (727) 2912606 हा चॅटबॉटचा नंबर आहे. हा नंबर युजर्सना कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करावा लागणार आहे. चॅटबॉट सुरू करण्यासाठी 'Hi' शब्द लिहून या नंबरवर मेसेज सेंड करा.
IFCN चं हे चॅटबॉटफक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. मात्र लवकरच हिंदी, स्पॅनिशसह इतर भाषांमध्ये ते अपडेट करू शकतात.
चॅटबॉटच्या मदतीने युजर्स फॅक्ट चेक करू शकतात. त्याचबरोबर कोरोना व्हायरसशी निगडीत अन्य बातम्यांबाबतही जाणून घेऊ शकतात.
व्हॉट्सअॅपवरचे सर्व मेसेज अँड-टू-अँड एन्क्रिप्शनसोबत येतात. कंटरी कोडच्या मदतीने हे केलं जातं.
व्हॉट्सअॅप युजर्स याबाबतची अधिक माहिती व्हॉट्सअॅपच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मिळवू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.