whatsapp launched chatbot feature know about it SSS
फेक न्यूजपासून वाचण्यासाठी WhatsApp ने आणलं खास फीचर, असं करा फॅक्ट चेक By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 8:47 PM1 / 12भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 49,000 हून अधिक झाला असून 1600 अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.2 / 12कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान घरबसल्या लोक सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह झाले असून त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे.3 / 12सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज, बातम्या, फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही लोक कोरोनासंदर्भातील बातम्या, व्हिडिओ, फोटो चुकीच्या पद्धतीने व्हायरल करत आहेत.4 / 12देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा वेळी अनेकदा फेक मेसेज हे खरे वाटतात. व्हायरल गोष्टींमागचं सत्य जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 5 / 12व्हॉट्सअॅपचा वापर ही लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात केला जात असून व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. 6 / 12व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळी ही व्हॉट्सअॅपने फेक न्यूजला आळा घालण्यासाठी नवं फीचर आणलं आहे. 7 / 12पॉयन्टर इंस्टीट्यूटच्या इंटरनेशनल फॅक्ट-चेकिंग नेटवर्क (IFCN)सोबत फेसबुकची मालकी असलेली कंपनी व्हॉट्सअॅपने भागीदारी केली आहे. IFCN ने व्हॉट्सअॅपवर आपला चॅटबॉट लाँच केला आहे.8 / 12+1 (727) 2912606 हा चॅटबॉटचा नंबर आहे. हा नंबर युजर्सना कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करावा लागणार आहे. चॅटबॉट सुरू करण्यासाठी 'Hi' शब्द लिहून या नंबरवर मेसेज सेंड करा. 9 / 12IFCN चं हे चॅटबॉटफक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. मात्र लवकरच हिंदी, स्पॅनिशसह इतर भाषांमध्ये ते अपडेट करू शकतात.10 / 12चॅटबॉटच्या मदतीने युजर्स फॅक्ट चेक करू शकतात. त्याचबरोबर कोरोना व्हायरसशी निगडीत अन्य बातम्यांबाबतही जाणून घेऊ शकतात. 11 / 12व्हॉट्सअॅपवरचे सर्व मेसेज अँड-टू-अँड एन्क्रिप्शनसोबत येतात. कंटरी कोडच्या मदतीने हे केलं जातं.12 / 12व्हॉट्सअॅप युजर्स याबाबतची अधिक माहिती व्हॉट्सअॅपच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मिळवू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications