WhatsApp New Feature For Wallpapers On Voice Call Know About This New Feature
WhatsApp Call : आता WhatsApp वर व्हॉइस कॉल करणे अधिक मजेदार होणार, जाणून घ्या नवीन फीचर By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 5:46 PM1 / 7जगभरात इन्स्टंट मेसेजिंगची सुविधा देण्याऱ्या अॅप्समध्ये व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे सर्वात लोकप्रिय अॅप आहे. लाखो लोक आपल्या वैयक्तिक ते व्यावसायिक कामासाठी WhatsApp वापरतात. आज जवळजवळ प्रत्येक स्मार्टफोन युजर्स व्हॉट्सअॅप वापरतो. त्यामुळे लोकांची अनेक कामे सुलभ झाली आहेत. 2 / 7तसेच WhatsApp वापरणे खूप सोपे आहे. यामुळेच WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. WhatsApp आपल्या युजर्संना अनुभव अधिक चांगला करण्यासाठी वेळोवेळी नवनवीन अपडेट्स आणते. याच क्रमाने WhatsApp ने आणखी एक नवीन फीचर आणले आहे. 3 / 7काही दिवसांपूर्वी WhatsApp वर चॅट बेस्ड वॉलपेपर सपोर्ट जोडण्यात आले होते. ज्याद्वारे युजर्स प्रत्येक चॅट आणि ग्रुपवर वेगवेगळे चॅट बॅकग्राउंड सेट करू शकतात. तसेच, WhatsApp वर व्हॉईस कॉल करताना, डिफॉल्ट स्क्रीन बॅकग्राउंड होईल. या नवीन फिचरबद्दल अधिक जाणून घेऊया....4 / 7एका नवीन रिपोर्टनुसार, WhatsApp लवकरच आपल्या युजर्संना चॅट बॅकग्राउंड आपला इन-कॉल वॉलपेपर म्हणून वापर करण्याची परवानगी देईल. हे असे वॉलपेपर असतील जे युजर्संनी वेगवेगळ्या चॅटमध्ये सेट केले आहेत.5 / 7रिपोर्टनुसार, हे फिचर सध्या तयार करण्यात येत आहे. तसेच, अॅपचे बीटा व्हर्जन अद्याप Android किंवा iOS वर उपलब्ध नाही. जर तुम्ही WhatsApp चे स्टेबल व्हर्जन वापरत असाल, तर तुम्हाला या नवीन फीचरसाठी अजून थोडा वेळ थांबावे लागेल, कारण ते येण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे.6 / 7अलीकडे, WhatsApp ने iOS 15 वर काही नवीन फीचर अॅड केले आहे, ज्यात फोकस मोडसाठी सपोर्ट आणि नोटिफिकेशनसह ग्रुप आणि प्रोफाइल पिक्चर्स डिस्प्ले करणे समाविष्ट केले आहे.7 / 7याशिवाय, WhatsApp ने व्हॉईस नोट्स रेकॉर्ड करतेवेळी पॉजसोबत रिझ्युम सपोर्ट जोडला आहे. तुम्ही तुमचे अॅप अपडेट केले नसेल, तर तुम्ही ते अॅप स्टोअरवरून ताबडतोब अपडेट केले पाहिजे जेणेकरून तुम्हालाही या फिचर्सचा आनंद घेता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications