शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp: व्हॉट्सॲप बंद होणार का? मेसेज, व्हिडीओ कॉल, व्हॉइस कॉल, नोटिफिकेशन्स हे सर्व बंद झाले की...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 8:10 AM

1 / 10
व्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसीची सक्ती केल्याने अनेक युझर्सनी या मेसेजिंग ॲपला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर व्हॉट्सॲपने थोडी नरमाईचे धोरण स्वीकारत प्रायव्हसी पॉलिसीची अंतिम मुदत १५ मेपर्यंत वाढवली. शनिवारी ही मुदत संपुष्टात आली.
2 / 10
तत्पूर्वी प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार न करणाऱ्यांचे अकाऊंट सुरूच राहील, असे व्हॉट्सॲपतर्फे स्पष्ट करण्यात आले. हे खरे असले तरी पॉलिसीचा अव्हेर करणाऱ्यांचे अकाऊंट टप्प्याटप्प्याने बंद होणार आहे.
3 / 10
काय होणार आजपासून - व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करण्याची अंतिम मुदत १५ मे रोजी संपुष्टात आली. आता येथून पुढे ठरावीक अंतराने व्हॉट्सॲपच्या वापरात बदल होत जातील.
4 / 10
प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार न करणाऱ्या युझर्सना सुरुवातीच्या टप्प्यात नियमितपणे पॉलिसीची आठवण करून देण्यासंदर्भातील मेसेज येत राहतील
5 / 10
नंतर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्स चालू राहतील परंतु चॅटिंगवर मर्यादा येऊ लागतील. तुम्ही नोटिफिकेशन्सचा पर्याय सुरू ठेवला असेल तर व्हिडीओ कॉल्स आणि मेसेजसला उत्तरे देऊ शकाल. काही आठवड्यानंतर हे सर्व बंद होईल. तत्पूर्वी व्हॉट्सॲप तुम्हाला दररोज प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्याचा आग्रह करणारे मेसेज पाठवत राहील
6 / 10
पर्याय काय राहील? मेसेज, व्हिडीओ कॉल, व्हॉइस कॉल, नोटिफिकेशन्स हे सर्व बंद झाले की व्हॉट्सॲपवर वारंवार एकच संदेश येईल आणि तो म्हणजे प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्याचा व्हॉट्सॲप ओपन करताच पॉलिसी स्वीकारा अन्यथा व्हॉट्सॲप सोडा, असा संदेश येईल.
7 / 10
युझरला नाइलाजाने पॉलिसीचा स्वीकार करावा लागेल वा व्हॉट्सॲप सोडून अन्य मेसेजिंग ॲप जवळ करावे लागेल. ज्या युझर्सनी आधीच सर्व पॉलिसीचा स्वीकार केला आहे त्यांना बिनधोकपणे व्हॉट्सॲप वापरता येणार आहे. वारंवार आठवण करून दिल्यानंतरही युझरने प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारलीच नाही तर व्हॉट्सॲपवर इनकमिंग कॉल्स बंद होतील
8 / 10
मेसेजेस येणेही बंद होईल. पॉलिसी स्वीकारा अन्यथा व्हॉट्सॲप पूर्ण बंद होईल, अशी सूचना वारंवार मोबाइलवर व्हॉट्सॲप ओपन केले की झळकलेली दिसेल. प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी ८ फेब्रुवारी ही अंतिम मुदत देण्यात आली होती; मात्र त्यानंतर ही मुदत १५ मेपर्यंत वाढविण्यात आली होती.
9 / 10
WhatsApp मध्ये आता लवकरच स्टेट्स प्रमाणे पाठवण्यात आलेले मेसेज 24 तासांत आपोआप गायब होणार आहेत. सध्या पाठवण्यात आलेले मेसेज सात दिवसांनंतर आपोआप गायब होतात. मात्र आता कंपनी यात बदल करणार आहे.
10 / 10
Window Mobile मधून ३१ डिसेंबरपासून व्हॉट्सअप बंद झालं. त्याचसोबत काही आयफोन युजर्सलाही याचा फटका बसला. Android यूजर्सबाबत सांगायचं झालं तर ज्या यूजर्सकडे Android 2.3.7 यात व्हॉट्सअप सपोर्ट मिळणार नाही.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप