शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

World Emoji Day : बऱ्याचदा 'या' इमोजींचा केला जातो चुकीचा वापर; जाणून घ्या खरा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 3:36 PM

1 / 9
17 जुलै हा दिवस जगभरात 'वर्ल्ड इमोजी डे' म्हणून साजरा करण्यात येतो. सोशल मीडियावर व्यक्त होताना अनेकदा आपण शब्दांऐवजी इमोजीचा वापर करतो. मजा, मस्करी, राग, प्रेम यांसारख्या कोणत्याही भावना व्यक्त करायच्या असल्यास इमोजीचा वापर होतो.
2 / 9
व्हॉट्सअ‍ॅपवर सर्रासपणे भावना व्यक्त करताना इमोजीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपवर आपण खूप इमोजी वापरतो त्यापैकी काहींचा अर्थ हा वेगळाच असतो. अशाच काही इमोजींचा खरा अर्थ जाणून घेऊया.
3 / 9
या इमोजीचा वापर हा प्रामुख्याने रडण्याच्या एक्स्प्रेशनसाठी केला जातो. मात्र हा इमोजी चेहऱ्यावरील थकवा दर्शवण्यासाठी आहे.
4 / 9
ओके अथवा एखादी कूल रिअ‍ॅक्शन देण्यासाठी हा इमोजी वापरला जातो. मात्र याचा खरा अर्थ मला कॉल कर असा आहे.
5 / 9
रडण्यासाठी या इमोजीचा वापर केला जातो. मात्र उदास असा त्याचा खरा अर्थ आहे. अनेकदा बॉस ओरडल्यानंतर कर्मचाऱ्यांची अशी अवस्था होते.
6 / 9
या इमोजीचा खरा अर्थ अपसाइड डाऊन असा होतो. मात्र याचा वापर हा व्यंग अथवा जोक दर्शवण्यासाठी काही वेळा केला जातो.
7 / 9
उडणारे केस आणि त्यासारखे एक्स्प्रेशन दर्शवण्यासाठी मुली या इमोजीचा वापर करतात. मात्र याचा खरा अर्थ वेटरेस असा आहे.
8 / 9
गोंधळलेल्या स्थितीत आहोत हे समोरच्या मंडळींना दाखवण्यासाठी या इमोजीचा वापर केला जातो. मात्र खोटं बोलत आहोत असा त्याचा खरा अर्थ आहे.
9 / 9
पूश अप अथवा मसाजसाठी खाली झुकलो आहोत हे सांगण्यासाठी हा इमोजी प्रामुख्याने वापरतात. मात्र याचा खरा अर्थ हा माफी मागणे असा आहे. एखाद्या चुकीबाबत क्षमा मागण्यासाठी या इमोजीचा वापर करावा.
टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडिया