Tunisha Sharma: शिजान खानसोबत असं होतं तुनिशा शर्माचं नातं, त्याच्यासाठी वेळोवेळी लिहायची अशा पोस्ट By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 11:24 AM 2022-12-25T11:24:52+5:30 2022-12-25T11:29:05+5:30
Tunisha Sharma Death: तुनिशा शर्मा आणि शिजान यांच्यात कसं नातं होतं, याचा अंदाज त्यांच्या इंस्टा अकाउंटवरून घेता येतो. त्यातच आता तुनिशा हिच्या आत्महत्येप्रकरणी संशयाची सुई शिजान खान याच्याकडे वळली आहे. तुनिशाच्या मनात शिजानबाबत काय भावना होत्या, याचा घेतलेला हा आढावा. तुनिशा शर्मा आणि शिजान यांच्यात कसं नातं होतं, याचा अंदाज त्यांच्या इंस्टा अकाउंटवरून घेता येतो. त्यातच आता तुनिशा हिच्या आत्महत्येप्रकरणी संशयाची सुई शिजान खान याच्याकडे वळली आहे. तुनिशाच्या मनात शिजानबाबत काय भावना होत्या, याचा घेतलेला हा आढावा.
इंटरनॅशनल मेन्स डे दिवशी तुनिशा शर्माने शिजानचं कौतुक करणारी एक प्रदीर्घ पोस्ट लिहिली होती. त्यात ती लिहिते की, हॅप्पी इंटरनॅशनल मेन्स डेच्या माझ्या जीवनात असलेल्या माणसाला खूप खूप शुभेच्छा. तो मला असाच लिफ्ट करतो. तो खूप मेहनती, पॅशनेट, वाईल्ड आणि माझ्या जीवनातील सर्वात हँडसम पुरुष आहे. तुला माहिती नाही आहे, पण तू आहेस.
जेव्हा शिजानचा वाढदिवस होता तेव्हा तुनिशाने आपल्या इन्स्टाग्रामवर त्याचा आणि आपला एक रोमँटिक फोटो पोस्ट केला. त्यावर दोघेही गवतावर झोपून हसत होते. हॅप्पी बर्थडे लव्ह, अशी कॅप्शन तिने या फोटोला दिली होती. यावरून ती त्याच्यावर किती प्रेम करायची याचा अंदाज येतो.
गणेश चतुर्थी दिवशीही तुनिशा हिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तुनिशाने शिजानसोबत गणपतीची पूजा करतानाचा सुंदरसा फोटो शेअर केला होता. तेव्हा युझर्सनी त्यांना ट्रोल केले होते. तसेच हा लव्ह जिहाद असल्याचे म्हटले होते. तुनिशा ही सेक्युलॅरिझमच्या जाळ्यात अडकली असल्याचा दावा ट्रोलर्सनी केला होता.
तुनिशा आणि शिजान जेव्हा पहिल्यांदा भेटले होते तेव्हाचाही एक सुंदर फोटो तिने शेअर केला होता. लडाखमधील शूटिंगदरम्यानचा हा फोटो शेअर करत तुनिशाने लिहिले होते की, इथून प्रवासाला सुरुवात झाली आहे.