10 places to visit in kodaikanal Tamilnadu
कोडईकनालमधील नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला इथे जाण्यास भाग पाडेल! By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 12:09 PM2019-06-05T12:09:29+5:302019-06-05T12:23:58+5:30Join usJoin usNext Kodaikanal हे ठिकाण तामिळनाडूच्या डिंडिगुल जिल्ह्यातील पलानी हिल्समध्ये आहे. याचा अर्थ 'The Gift Of The Forest' असा होतो. घनदाट जंगलं आणि सुंदर नजाऱ्यांना सजलेल्या ठिकाणाला लोक हिल-स्टेशनांची राजकुमारी असंही म्हणतात. तुम्हाला रोजच्या वर्दळीपासून कुठे जायचं असेल तर तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. १) कुरिन्जी अंदावर मंदिर - कोडइकनालमध्ये कुरिन्जी अंदावर मंदिर फिरण्यासाठी फार चांगलं ठिकाण आहे. या मंदिराच्या भीतींवरून डोंगरांचा सुंदर नजारा बघायला मिळतो. तसेच मंदिराच्या बाहेर अनेक दुकाने आहेत, जिथे तुम्ही वेगवेगळ्या ग्रामीण कलाकृती तुम्ही खरेदी करू शकता. (Image Credit : Kodaikanal Tourism) २) ब्रायंट पार्क - हा पार्क ब्रिटीश काळात ग्लेन ब्रायंट या व्यक्तीने तयार केला होता. इथे अनेकप्रकारचे झाडं असलेलं एक ग्रीन हाऊस आहे. त्यासोबतच मे महिन्यात या पार्कमध्ये फ्लॉवर शो सुद्धा आयोजित करण्यात येतो. (Image Credit : Holidify) ३) La Saleth Church - हा चर्च १८०० मध्ये तयार करण्यात आला होता. हे चर्च ऐतिहासिक असण्यासोबतच धार्मिक स्थळही आहे. इथे तुम्ही रविवारी भेट देऊ शकता. (Image Credit : TripAdvisor) ४) Kodaikanal Solar Observatory - हे ठिकाण विद्यार्थ्यांसाठी एक चांगलं ठिकाण आहे. हे भारतीय खगोल संस्थेने तयार केलं आहे. ५) शेनबागानूर म्युझिअम - शेनबागानूर म्युझिअमला मानव विज्ञान, हस्तशिल्प, वनस्पती आणि जीव अशा वेगवेगळ्या भागांमध्ये विभागण्यात आलं आहे. या म्युझिअममध्ये वेगवेगळे जीव बघायला मिळतात. तसेच २५०० प्रकारची झाडेही बघायला मिळतात. (Image Credit : jcpgrandinn.in) ६) Kodaikanal लेक - ही तलाव १८३६ मध्ये तयार करण्यात आला होता. हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षण आहे. इथे जाण्यासाठी सर्वात चांगली वेळ म्हणजे उन्हाळा. (Image credit : Trans India Travels) ७) पिलर रॉक्स - Kodaikanal मध्ये पिलर रॉक्स जमिनीपासून जवळपास ४०० फूड उंचीवर आहेत. पावसाच्या पाण्याने तयार झालेल्या जंगलामध्ये हे आहे. हे ठिकाण पिकनिकसाठी परफेक्ट आहे. (Image Credit : TripMe) ८) चीडचे जंगल - हे जंगल १९०६ मध्ये तयार करण्यात आलं होतं. आता हे जंगल चांगलंच घनदाट झालं आहे. फोटोग्राफीडी आवड असणाऱ्यांनी इथे आवर्जून भेट द्यावी. ९) चॉकलेट फॅक्टरी - इथे एक चॉकलेटची फॅक्टरी आहे. इथे तुम्ही चॉकलेट कसे तयार करतात हे बघू आणि चॉकलेटची खरेदीही करू शकता. (Image Credit : tripadvisor.com) १०) डोलमेन सर्किल - सप्टेंबर महिन्यात डोलमेन सर्कलमध्ये वॉटरफॉलचा आनंद घेऊ शकता. कारण त्यावेळी पावसाला सुरूवात झालेली असते. डोंगरातून खाली कोसळणारं पाणी बघण्यात एक वेगळीच मजा येईल. (Image Credit : Holidify)टॅग्स :तामिळनाडूट्रॅव्हल टिप्सTamilnaduTravel Tips