Amazing natural wonders of India to visit
आवर्जून भेट द्यावे अशी भारतातील ४ नैसर्गिक आश्चर्य! By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 1:15 PM1 / 5आतापर्यंत तुम्ही जगभरातील ७ आश्चर्यांबाबत ऐकलं असेल आणि ते पाहिलेही असतील. पण आज आम्ही तुम्हाला भारतातील नैसर्गिक आश्चर्यांबाबत सांगणार आहोत. हे नैसर्गिक आश्चर्ये त्यांच्या वेगळेपणा लोकप्रिय आहेत. तुम्हाला अशाच एखाद्या रोमांचक आणि वेगळा अनुभव देणाऱ्या ट्रिपचं प्लॅनिंग करायचं असेल तर या ठिकाणांना भेट देऊ शकता. (Pic Credit: Colours of North-Eastern India) 2 / 5मजूली आयलॅंड - हे जगातलं सर्वात मोठं रिव्हर आयलॅंड आहे. जे आसाममध्ये ब्रम्हपुत्रा नदीच्या किनारी स्थित आहे. हे ठिकाण वेगवेगळ्या वनस्पती आणि जीव-जंतूंसाठी चांगलंच लोकप्रिय आहे. इथे अनेक दुर्मिळ वनस्पती आढळतात. त्यामुळे या ठिकाणाचं वेगळं महत्त्व आहे. (Pic Credit: Facebook/North East Guide) 3 / 5लिविंग रुट ब्रिज - चेरापूंजीमध्ये स्थित या रुट ब्रिजला डबल डेकर लिविंग रुट ब्रिजही म्हटलं जातं. हा ब्रिज म्हणजेच पूल Ficus Elastica झाडापासून तयार होतो. (Pic Credit: homesecurity.press)4 / 5मार्बल रॉक्स - मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये असलेलं मार्बल रॉक्स नर्मदा नदीच्या किनारी स्थित आहे. हा डोंगर इतका सुंदर आहे की, एकटक बघतच रहावं असं वाटतं. ३ किलोमीटरच्या परिसरात पसरलेल्या या मार्बल रॉक्स डोंगराला बघण्यासाठी दूरदूरुन लोक येतात. (Pic Credit: Facebook/AtoZ Updates)5 / 5लोकताक तलाव (फ्लोटिंग लेक) - फ्लोटिंग लेक म्हणजेच लोकताक तलाव मणिपूरमध्ये आहे. हा तलाव त्याच्या तरंगत्या वनस्पती आणि मातीपासून तयार द्वीपांसाठी लोकप्रिय आहे. या द्वीपांना 'कुंदी' असंही म्हटलं जातं. ही जगातला एकुलता एक फ्लोटिंग लेक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications