Beautiful Places for Monsoon
पावसाळ्यात भारतातील 'या' सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 05:09 PM2018-07-11T17:09:18+5:302018-07-11T17:16:17+5:30Join usJoin usNext हातात चहाचा कप मागे रेडिओवर सुरु असलेल्या गझल आणि एखाद्या सुंदर ठिकाणी कोसळणाऱ्या पावसाचा आनंद घ्यावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पावसाळ्यात अशा काही खास ठिकाणांना भेट देण्याची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला काही खास ठिकाणांचे पर्याय सांगत आहोत. या ठिकाणांना नक्की भेट द्या फागू - हिमाचल प्रदेशमध्ये असलेले फागू हिल स्टेशन शिमलापासून काही अंतरावर आहे. पावसाळ्यात या ठिकाणाला भेट देण्याची बातच काही और आहे. पावसाळ्यात येथे सर्वत्र हिरवळ पसरते. तसेच जागोजागी संफरचंद आणि ऑर्किडच्या झाडांवर आलेल्या बहरामुळे याठिकाणचे सौंदर्य बहरून येते. भीमताल - उत्तराखंडमध्ये असलेलं हे अत्यंत सुंदर ठिकाण आहे. निसर्गसौंदर्याने नटलेलं हे ठिकाण तेथील शांततेसाठीही ओळखले जाते. येथील मुख्य आकर्षण म्हणजे येथील भीमताल तलाव. या भीमताल तलावाच्या मधोमध बनलेल्या बेटावर उभारण्यात आलेल्या रेस्टॉरंटमध्ये नक्की भेट द्या. नांगल वेटलॅन्ड - हे शहर पंजाबमध्ये असून सतलुज नदीवर असलेल्या भाखडा डॅमवर आहे. नदी आणि सुंदर डोंगरदऱ्यांनी सजलेल्या नांगल वेटलॅन्डचे सौंदर्य पावसाळ्यात आणखी खुलून येते. कसौली - हिमाचल प्रदेशमधील सर्वात सुंदर जागांपैकी एक म्हणजे कसौली. या ठिकाणाला तुम्ही वर्षभर भेट देऊ शकता. पण पावसाळ्यात येथे भेट देणे सर्वात उत्तम. येथील उंच डोंगरदऱ्यांमध्ये रिमझिमणाऱ्या पावसामध्ये भटकंती करणे मन प्रसन्न करते. अल्मोडा - हे उत्तरखंड राज्यामध्ये आहे. उत्तराखंडच्या कुमाऊ एरियामध्ये अल्मोडा शहर आहे. पावसाळ्यामध्ये या शहराचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. देवनारची उंच-उंच झाडे पावसाळ्यात आणकी खुलून दिसतात.टॅग्स :प्रवासTravel