शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकटं फिरायला जाण्याचा विचार करताय? तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 5:55 PM

1 / 8
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा मिळावा या हेतूनं सर्वच जण फिरायला जाण्याचा बेत आखतात. मात्र तुम्ही जर एकटं फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या.
2 / 8
मनाली - हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यातील मनाली हे अत्यंत निसर्गरम्य शहर आहे. बर्फाच्छादित पर्वतशिखरे, उत्तुंग देवदार वृक्ष, जवळून वाहणारा व्यास नदीचा प्रवाह, थंड व आल्हाददायक हवामान यामुळे मनाली हे पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरले आहे.
3 / 8
उदयपूर - राजस्थानमधील उदयपूर हे अत्यंत सुंदर शहर आहे. उदयपूरला 'सिटी ऑफ लेक' असेही म्हटले जाते. उदयपूरमध्ये राज महल, विंटेज कार संग्रहालय, लेक पॅलेस, गुलाब बाग, नेहरू द्वीप उद्यान, महाराणा प्रताप स्मारक, नाथ द्वारा, एकलिंगजी मंदिर यासारखी सुंदर ठिकाणं आहेत.
4 / 8
गोवा - एकदा तरी गोवा ट्रिप करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. मस्ती, खवय्येगिरी आणि समुद्रकिनारे यांचा आनंद घेण्यासाठी गोवा अत्यंत सुंदर ठिकाण आहे. तसेच गोवा हे प्राचीन मंदिरं व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दलसाठीही प्रसिद्ध आहे.
5 / 8
शिमला - हिमाचल प्रदेशमधील शिमला हे हिल स्टेशन देशातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. बाराही महिने येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.
6 / 8
खजुराहो - मध्य प्रदेशमधील खजुराहो हे ठिकाण पर्यटकांसाठी अत्यंत सुरक्षित ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच खजुराहोला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून दर्जा दिला आहे.
7 / 8
दार्जिलिंग - निसर्गरम्य वातावरण, पांढरा शुभ्र बर्फ, थंड हवा, रंगीबेरंगी फुलं, नद्यांचा संगम आणि प्रेमात पाडणारं सुंदर विश्व अनुभवायचं असेल तर दार्जिलिंगला नक्की भेट द्या. दार्जिलिंगमधील पर्यटन स्थळावर अनेक चित्रपटातील सुंदर सीन हे शूट केले आहेत.
8 / 8
नैनिताल - उत्तराखंडमधील नैनिताल म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. येथील आल्हाददायक वातावरणामुळे सगळा थकवा दूर होतो.
टॅग्स :Travelप्रवास