Best snowfall destination in India for winter holiday
शिमला-मनाली सोडून भारतातील बेस्ट स्नोफॉल डेस्टिनेशन्स! By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 3:24 PM1 / 10कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होऊ लागली आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्याही लागणार आहेत. अशात अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. काही लोक थंडीत गरम वाटावं अशा ठिकाणांची निवड करतात तर काही लोक हे जिथे बर्फ पडतो अशा ठिकाणांची निवड करतात. पण शिमला, मनाली आणि काश्मीर सोडून अनेकांना वेगवेगळे स्नोफॉल डेस्टिनेशच माहीत नसतात. त्यामुळे वेगळ्या १० स्नोफॉल डेस्टिनेशनची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. 2 / 10चादर ट्रॅक- लडाख - चादर ट्रॅक लडाखच्या जंस्कार परिसरात आहे. इथे जगातले सर्वात धोकादायक ट्रेकिंग ट्रॅक आहेत. कारण इथे सतत गोठलेल्या नदीवरुन ट्रेकिंग करावं लागतं. इथे तुम्हाला एकापेक्षा एक बर्फाने झाकलेले डोंगर बघायला मिळतील. इथे जाताना तुम्हाला थंडीपासून बचाव करण्यासाठी जरा जास्तच काळजी घ्यावी लागणार आहे. 3 / 10रुपकुंड - उत्तराखंड - रुपकुंड हिमालयाचा बर्फ वितळून तयार होणारा एक तलाव आहे. जवळपास ५०२९ फूट उंचीवर स्थित या तलावाला कंकाळ तलाव म्हणूनही ओळखलं जातं. ट्रेकिंगचे शौकीन लोक इथे काठगोदाहून पोहोचू शकतात. 4 / 10तवांग - अरुणाचल प्रदेश - तवांगला भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ आहे. या शहराची सीमा तिबेट, भूतान आणि चीनला लागून आहे. इथे तुम्हाला ट्रेकिंगसोबतच तीनही देशांच्या सीमांचा नजारा बघायला मिळणार आहे. 5 / 10सोमगो तलाव - सिक्कीम - सोमगो तलावाचं सौंदर्य थंडीच्या दिवसात दुप्पट होतं. गंगटोकपासून ३५ किमी दूर नाथुला दरीजवळ आहे. इथे तुम्हाला हिमालयन हरीण आणि लाल पांडा यांसारखे दुर्मिळ प्राणी बघायला मिळतील. तसेच येथून कांचनगंगा डोंगरांचा सुंदर नराजाही येथून बघायला मिळतो. 6 / 10सोनमर्ग - काश्मीर - सोनमार्ग एक आयडियल स्नो व्हॅकेशन डेस्टिनेशन आहे. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या लोकांसाठी हे ठिकाणा स्टार्टिंग पॉईंट आहे. इथे तुम्ही थजिवास ग्लेशिअर, सत्सर तलाव, जोजीला पास आणि निनिचाई जवळ फिरु शकता. 7 / 10नारकंडा - हिमाचल प्रदेश - हिमाचल प्रदेशातील या हिल स्टेशनच्या सौंदर्याची चर्चा केवळ देशातच नाही तर परदेशातही आहे. राज्य सरकारकडून इथे डिसेंबर ते मार्च महिन्यात ट्रेकिंगचं प्रशिक्षणही आयोजित केलं जातं. 8 / 10रोहतांग पास - हिमाचल प्रदेश - रोहतांग पास हे ठिकाण लाहौल स्पीती आणि मनाली घाटाला जोडण्याचं काम करतं. इथे तुम्ही बर्फवृष्टीसोबतच स्कीइंग, ट्रेकिंग आणि पॅराग्लायडिंगचा आनंद घेऊ शकता. पण इथे फिरण्याआधी तुम्हाला इंडियन आर्मीकडून परवानगी घ्यावी लागते. 9 / 10पराशर तलाव - हिमाचल प्रदेश - पराशर तलाव हा फारच शांत परिसर आहे. असे सांगितले जाते की, इथे पराशर ऋषींनी तप केला होता. इथे त्यांचं एक मंदिरही तयार करण्यात आलं आहे. या तलावाची खासियत ही आहे की, याच्या आजूबाजूला एकही झाड नाहीये आणि यात एक छोटं आयलंड असून ते पाण्यात इकडून तिकडे फिरत असतं. 10 / 10गंगटोक - सिक्कीम - मोठ-मोठे डोंगर आणि बर्फाने झाकलेले डोंगर येथील शान आहेत. या ठिकाणाला लॅंड ऑफ मोनेस्टी असेही म्हटले जाते. इथे तीस्ता नदीत रिवर राफ्टिंगचा आनंद तुम्ही घेऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications