coldest cities in the world
इथल्या तापमानाचा आकडा पाहूनच गारठून जाल! By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 5:31 PM1 / 7ओयम्यकॉन, रशिया- रशियातल्या सैबेरियातलं हे गाव आर्टिक सर्कलजवळ आहे. इथलं तापमान उणे 50 अंश सेल्सिअस इतकं आहे. 2 / 7वर्खोयान्स्क, रशिया- सैबेरियातल्या या गावातलं तापमानही उणे 50 अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. 3 / 7स्नॅग, कॅनडा- युकून शहराजवळ अलास्का हायवेजवळ असणाऱ्या या गावातलं कायम शून्याच्या खाली असतं. इथलं लोक हिवाळ्यात घराबाहेरदेखील पडत नाहीत.4 / 7उलानबाटार, मंगोलिया- मंगोलियाच्या राजधानीचं शहर असलेल्या उलानबाटारमध्ये 2015 मध्ये उणे 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. 5 / 7अस्ताना, कझाकस्तान- हिवाळ्यात अस्तानातलं तापमान उणे 30 ते उणे 35 अंशांपर्यंत घसरतं. नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान अस्तानातली नदीदेखील गोठते. 6 / 7हर्बिन, चीन- आईस सिटी अशी हर्बिनची ओळख आहे. या ठिकाणचा विंटर फेस्टिव्हल जगप्रसिद्ध आहे. इथलं तापमान कायम उणे 40 अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. 7 / 7यलोनाइफ, कॅनडा- हे कॅनडातलं सर्वात कमी तापमान असलेलं शहर आहे. जानेवारीत इथला पारा उणे 44 अंशांपर्यंत घसरतो. आणखी वाचा Subscribe to Notifications