To experience the beauty of monsoon, visit 'this' place!
पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी 'या' ठिकाणी भेट द्या ! By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 08:08 PM2018-07-10T20:08:45+5:302018-07-10T20:41:04+5:30Join usJoin usNext कोडायकनाल : तामिळनाडूमधील दिनदीगुल डोंगरांच्या मधोमध कोडायकनाल हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. इथे चारही बाजूंनी केवळ हिरवळ बघायला मिळते. पावसाळ्यात तर या ठिकाणी फारच सुंदर नजारा असतो. जर तुम्हाला अशा ठिकाणाचा शोध असेल तर इथे नक्कीच जाऊ शकता. देवरिया ताल : उत्तराखंडमधील मस्तुरा आणि सारी गावांजवळ हे ठिकाण आहे. पावसाळ्यात येथून दिसणारा नजारा बघण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी असते. या पावसाळ्यात आवर्जून भेट द्यायला हवी. मुन्नार : केरळमधील पावसाळा किती सुंदर आणि आकर्षक असतो हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. केरळमधील मुन्नारला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक पावसाळ्याची वाट पाहतात. कारण पावसाळ्यात इथे येऊन तुम्ही तुमच्या ताणतणावापासून मुक्ती मिळवू शकता. (Image Credit: www.munnar.com) बिष्णुपूर : पश्चिम बंगालच्या बंकुरा जिल्ह्यात हे ठिकाण असून पावसाळ्यात येथील नजारा मनमोहक असतो. येथील मंदिरे आणि डोंगर तुम्हाला कधीही न अनुभवलेला अनूभव देतील. (Image Credit: www.trekearth.com) जीरो : अरुणाचल प्रदेशातील जीरो या ठिकाणाचा समावेश वर्ल्ड हेरिटेजमध्ये आहे. अरुणाचल प्रदेशातील सर्वात सुंदर गावांमध्येही या गावाचा समावेश आहे. येथील निसर्गांचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यापेक्षा चांगला कोणताच ऋतू असू शकत नाही. (Image Credit: www.nativeplanet.com) उदयपूर : उदयपूर हे राजस्थानमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. या शहराला तलावांचं शहर असंही म्हटलं जातं. इथे पावसाळ्यात फारच मनमोकह वातावरण असतं. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी असते.टॅग्स :पाऊसप्रवासRainTravel