Five beautiful places for camping in India
भारतातील कॅम्पिंगसाठी 5 सुंदर ठिकाणं, एकदा नक्कीच फिरून या! By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 03:29 PM2019-03-13T15:29:10+5:302019-03-13T15:33:10+5:30Join usJoin usNext जैसलमेर हे प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. जैसलमेर हे शहर थार वाळवंटाच्या अगदी मध्य भागी स्थित नसले तरी बऱ्यापैकी वाळवंटी भागात स्थित आहे. त्यामुळेच जैसलमेर कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहे. अंजुना बीच हे उत्तर गोव्यात स्थित आहे. गोव्याची राजधानी पणजीपासून अंजुना बीच 18 किलोमीटर अंतरावर आहे. या बीचवर लाल रंगाची वाळू आहे. त्यामुळे पर्यटकांचं हे आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. स्पिती घाटी ही हिमाचल प्रदेशच्या लाहोल आणि स्पिती जिल्ह्यांमध्ये स्थित आहे. इथे पर्यटक कॅम्पिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. उत्तराखंडमधील मसुरीही कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहे. दिल्लीपासून हे फारच जवळ आहे. मार्चपासून जूनपर्यंत आपण इथे कॅम्पिंग करू शकता. काश्मीरमधील सोनमर्गही स्वर्गाएवढं सुंदर आहे. इथले डोंगर आणि नद्या पर्यटकांना सदोदित आकर्षित करतात. या ठिकाणी कॅम्पिंग करण्याची मजा काही औरच आहे. श्रीनगरवरून आपण सोनमर्गचा जाऊ शकता. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सजम्मू-काश्मीरराजस्थानTravel TipsJammu KashmirRajasthan