Ghost Town is known worldwide as the 6th most popular place in the world
घोस्ट टाऊनच्या नावानं जगभरात ही 6 ठिकाणं प्रसिद्ध By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 3:28 PM1 / 6देशभरात झपाटलेली अनेक ठिकाणं आहेत, जी हॉन्टेड प्लेसच्या नावानं प्रसिद्ध आहेत. कोलोराडोमध्येही सेंट एलमो हे झपाटलेलं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. 1922पासून इथली रेल आणि रोड सेवा बंद आहे. पूर्वापारपासून इथे राहत असलेली लोक पाहायला मिळतात. 2 / 6बोडी, कॅलिफोर्निया- वर्षं 1879मध्ये बोडी येथे सोन्याच्या खाणी होत्या. जवळपास 8500 लोकांचं इथे वास्तव्य होतं. गन फायटिंग आणि मारहाणीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध होतं. इथे 150हून अधिक इमारती असून, अनेक घरं रिकामीच आहेत. जे पाहून आपल्याला घोस्ट टाऊनचीच प्रचिती येईल. 3 / 6हम्बरस्टोन अँड सांता लॉरा, एटेकॅमा डेजर्ट- चिलीतील साल्टपीटर माइन्स 1958मध्येच बंद झाल्या. जे इथल्या लोकांच्या रोजगारासाठी महत्त्वाच्या होत्या. त्यानंतर इथली थिएटर्स, स्विमिंग पूल, घर, हॉटेल आणि दुकानं खाली करण्यात आली. 4 / 6भानगड, राजस्थान- भारतातल्या राजस्थानमध्ये भानगडही रहस्यमयी कथांसाठी प्रसिद्ध आहे. भानगड किल्ला हा जयपूरच्या राजानं 1720ला तयार केला होता. आजूबाजूला स्मशानशांतता असल्यानं पर्यटकही इथे आल्यावर घाबरतात. 5 / 6बेलशिटे जॅरागोजा प्रोव्हिन्स, स्पेन- वर्षं 1936-39मध्ये झालेल्या स्पेनिश सिव्हिल वॉरनंतर ही जागा खाली झाली. फ्रान्सने 1937मध्ये हे स्वतःच्या ताब्यात घेतले. इथले रस्ते आणि इमारती आता मोकळ्या दिसतात. 6 / 6कोलमन्सकॉप, नामीबिया- डायमंड माइनच्या जवळ नामीबिया डेझर्ट आहे. 1950नंतर या जागेवरून लोकांनी पलायन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही जागा रिकामी झाली. आणखी वाचा Subscribe to Notifications