शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शॉपिंगची हौस असल्यास 'या' ठिकाणांना आवर्जून भेट द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 12:53 PM

1 / 5
वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची हौस तर प्रत्येकालाच असते. तर काहींना शॉपिंग करण्याची मजा लुटायची असते. प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा असा अनुभव असतो. काही ठिकाणं हे शॉपिंगसाठीही प्रसिद्ध आहेत. इथे पर्यटक शॉपिंग करण्यासाठी आवर्जून येतात.
2 / 5
जयपूर एक असं शहर आहे की, त्याला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. जयपूरमधले कपडे हे स्टाइल वर्ल्डचा एक महत्त्वाचा भाग आहे. जयपुरी कपडे खरेदी करण्यासाठी लांबून लोक येतात. इथे गोल्ड आणि सिल्व्हर दागिन्यांचं आकर्षण आहे.
3 / 5
काश्मीरचं नाव ऐकताच बर्फाचे डोंगर समोर दिसू लागतात. जर आपल्याला काश्मीरमध्ये फिरायचं असल्यास शॉपिंग लिस्ट तयार करावी लागणार आहे. इथे वुड वर्क, पेंटिंग्ज, ज्वेलरी, चहा आणि शॉल आपल्या घराची शान वाढवणार आहेत.
4 / 5
चेन्नई तसं तर साइटसिंग, बीच आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु चेन्नईमध्ये अशाही काही वस्तू आहेत, ज्या तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता. इथे कांचीपूरम सिल्क मटेरियल, कपडे आणि दक्षिण भारतातले दागिने खरेदी करू शकता.
5 / 5
गोवा हे भारतीयांचं सर्वाधिक लोकप्रिय डेस्टिनेशन्स आहे. इथे बीच आणि नाइटलाइफ अनुभव्यासाठी दूरदूरुन लोक येतात. जर तुम्ही गोव्याला ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल तर तिथे शॉपिंग करण्यासारख्याही बऱ्याच गोष्टी आहेत.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स