India's wonderful caves ...
भारतातील अद्भूत लेण्या... By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 9:05 PM1 / 8भारतातील विविध ठिकाणी मानवी मनाला थक्क करणारा प्राचीन ठेवा अस्तित्वात आहे. त्या ठेव्यापैकीच एक भाग म्हणजे आपल्या पूर्वजांनी दगडांमध्ये खोदलेल्या लेण्या. भारतात विविध ठिकाणी अशा लेण्या अस्तित्वात आहेत.2 / 8उदयगिरी लेण्या (ओदिशा) - ओदिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरपासून जवळच उदयगिरीच्या लेण्या आहेत. 33 पर्वतांना खोदून या लेण्या तयार करण्यात आल्या आहेत. अज्ञातवासादरम्यान पांडवांनी इथेच वास्तव्य केल्याचे सांगितले जाते.3 / 8महाबलीपुरम वराह लेण्या - महाबलीपुरम वराह लेण्याही प्राचीन आणि प्रेक्षणीय आहेत. या लेण्या पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येत असतात.4 / 8भीमबेटका लेण्या - भीमबेटका लेण्या मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील रतापाणी अभयारण्यात आहेत. या लेण्या 30 हजार वर्षे जुन्या असल्याचे सांगितले जाते.5 / 8बाराबर लेण्या - बिहारमधील बाराबर लेण्याही प्राचीन आहेत. मौर्यकाळामध्ये या लेण्यांची निर्मिती झाली होती.6 / 8बदामी लेण्या - कर्नाटकमधील बदामीच्या लेण्या जगप्रसिद्ध आहेत. तसेच येथील बदामी मंदिरही प्रसिद्ध आहे.7 / 8एलिफंटा - महाराष्ट्रातील एलिफंटा बेटांवर असलेल्या एलिफंटा लेण्या प्रसिध्द आहेत. येथे एकूण सात लेण्या आहेत.8 / 8अजिंठा आणि वेरुळच्या लेण्या - अजिंठा आणि वेरुळच्या लेण्या औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. या लेण्यांमध्ये हिंदू आणि बौद्ध लेण्यांचा समावेश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications