शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रंगीबेरंगी फुलांनी सजलेले जगातील 'हे' पाच अप्रतिम बोगदे नक्की पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 4:08 PM

1 / 6
एखाद्या शहरात प्रामुख्याने एकमेकांशी संपर्क साधनं सोयीचं व्हावं, अनेक परिसरांशी, लोकांशी पटकन कनेक्ट होता यावं या दृष्टीने बोगदे तयार केले जातात. मात्र जगात असे पाच अप्रतिम रंगीबेरंगी बोगदे आहेत जे पाहिल्यावर तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल. 'हे' पाच बोगदे कोणते ते जाणून घेऊया.
2 / 6
सकुरा बोगदा - जपानमधील सकुरा बोगदा हा सर्वात सुंदर, आकर्षक, अप्रतिम बोगदा आहे. गुलाबी आणि पांढऱ्या फुलांनी नटलेला हा बोगदा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. तुम्ही जर जपानमध्ये जाण्याचा बेत आखत असाल तर सकुरा बोगद्याला नक्की भेट द्या.
3 / 6
सायप्रस बोगदा - निसर्ग सौंदर्याने सजलेला सायप्रस बोगदा हा अमेरिकेतील सर्वात सुंदर रचनेपैकी एक आहे. कॅलिफोर्निया प्लाइंट रेयस मधील या बोगद्यातून एक सुंदर रस्ता जातो. सायप्रस बोगद्याच्या सुंदरतेमुळे तेथून प्रवास करणं हा एक रोमांचकारी अनुभव आहे.
4 / 6
चेरी ब्लॉसम बोगदा - चेरीच्या सुंदर फुलांनी सजलेला चेरी ब्लॉसम हा जादुई बोगदा जर्मनीत आहे. उन्हाळ्यात चेरीच्या फुलांचा बहर असल्याने तेव्हा खऱ्या अर्थाने हा बोगदा प्रतिम दिसतो.
5 / 6
टनल ऑफ लव्ह - टनल ऑफ लव्ह हा बोगदा खास करून प्रेम करणाऱ्यांसाठी तयार करण्यात आल्याचं म्हटलं जातं. युक्रेनमध्ये असलेल्या या सुंदर बोगद्यातून अगदी मधोमध ट्रेन जाते. जवळपास 3 किलोमीटर असलेल्या या बोगद्यातून प्रवास करणं हे स्वर्गसुख अनुभवल्यासारखं आहे.
6 / 6
जकरंदस वॉक - जोहान्सबर्गमध्ये असलेला जकरंदस या बोगदयाचं मोहनीय रूप पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. अप्रतिम सौंदर्य असलेला हा बोगदा पाहण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात एकदा तरी दक्षिण आफ्रिकेची ट्रिप नक्की करा.
टॅग्स :Travelप्रवास