must try these travel tips vacation
स्ट्रेस फ्री हॉलिडे ट्रिपसाठी 'या' टिप्स करा फॉलो By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 3:46 PM1 / 6रोजच्या कामातून विश्रांती मिळावी म्हणून सुट्टी घेतली जाते. मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अनेकजण ट्रिपचं आयोजन करतात. मात्र सुट्टीचा मनमुराद आनंद लुटाण्यासाठी तसेच स्ट्रेस फ्री हॉलिडेसाठी 'या' टीप्स करा नक्की फॉलो करा. 2 / 6सहलीसाठी योग्य ठिकाणाची निवड करा. त्या ठिकाणचे वातावरण, राहायची सोय आणि पर्यटन स्थळं याची माहिती घ्या. 3 / 6फिरायला गेल्यावर खरेदी देखील केली जाते. तसेच त्या ठिकाणच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. विविध ठिकाणांना भेट देता येते. मात्र यासाठी पैशाची आवश्यकता असते. त्यामुळे पैशाचं योग्य नियोजन करा. 4 / 6प्रवासादरम्यान अनेकदा आजारी पडण्याचा धोका असतो. त्यामुळे काही औषध नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्यासोबत ठेवा. तसेच खाण्यासाठी सुका खाऊ आणि पौष्टिक पदार्थ बॅगेत ठेवा. 5 / 6सहलीच्या आठवणी जशा आपण मनात साठवतो तसेच ते क्षण फोटोंच्या स्वरूपात ही जपून ठेवता येतात. त्यामुळे कॅमेरा सोबत ठेवा आणि सुंदर ठिकाणांसोबत तुमचे फोटो काढा.6 / 6हॉलिडे ट्रिपसाठी अनेकजण सोशल मीडियाचा अधिक वापर करतात. त्यामुळे असं न करता मिळालेला मोकळा वेळ हा स्वत: साठी वापरा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींसाठी वेळ खर्च करा. आणखी वाचा Subscribe to Notifications