Places to visit in italy rome
इटलीमधील 6 सर्वात सुंदर ठिकाणं; आयुष्यात एकदा तरी भेट द्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 3:28 PM1 / 7 इटलीमध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर समुद्र किनारे, तलाव आणि डोंगर आहेत. इटलीमध्ये तुम्ही अनेक ऐतिहासिक ठिकाणं, कला, संगीत, संस्कृती, पवित्र स्थळं इत्यादी पाहू शकता. इटलीमध्ये फिरण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे, एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंतचा काळ ठरतो. तसं पाहायला गेलं तर तुम्ही इटलीमध्ये कधीही फिरायला जाऊ शकता. येथे तुम्हाला अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतील ज्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहू शकणार नाहीत. 2 / 7इटलीमधील राजधानीचं ठिकाण असलेलं रोम म्हणजे, फार सुंदर ठिकाण. तुम्ही येथे फिरण्यासाठी जाणार असाल तर कालीजीयम, सेंट पीटर की बेसिलिका आणि सेंट पीटर के स्क्वायर इत्यादी ठिकाणी फिरण्यासाठी जा. येथील वास्तुकला आणि इतर कलाकृती पाहून तुम्ही खरचं प्रसन्न व्हाल. 3 / 7इटलीतील वैशिष्ट असलेला झुकता मनोरा अर्नो नदिच्या किनाऱ्यावर आहे. पीसामध्ये लीनिंग टॉवर, ओरटो बोटानिको डि, बॉटनिकल गार्डन आणि म्युझिअमध्ये फिरण्यासाठी जाऊ शकता. येथे असलेलं बॉटनिकल गार्डन सर्वात जुनं गार्डन आहे. 4 / 7ग्रॅन्ड कॅनालमध्ये गोंडोलाची सफर करू शकता. याव्यतिरिक्त 30 मजल्यांची सेंट मार्कची बेसिलिका आणि कॅम्पनेइलची वास्तुकला पाहू शकता. 5 / 7जर तुम्हाला फॅशनेबल गोष्टींची अथवा वस्तूंची आवड असेल तर तुम्ही मिलानला जाऊ शकता. हे शहर फॅशन आणि डिझाइन्ससाठी ओळखलं जातं. येथे फिरण्यासाठी सांता मारिया डेला ग्राजी चर्च, लिओनार्डो दा विंची यांच्या अनेक कलाकृती पाहता येतील. 6 / 7इटलीमधील सर्वात जुन्या आणि सुंदर जागांपैकी एक असलेलं हे ठिकाण पर्टकांच्या आकर्षणाचं केंद्र असतं. हे जवळपास 1700 वर्ष जुनं आहे. 7 / 7जेव्हा तुम्ही इटलीमध्ये फिरण्यासाठी जाणार असाल तर फ्लोरेंस पाहायल विसरू नका. हे एक विशाल आउटडोर संग्रहालय आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications