Rajasthan forts which one should definately visit
राजस्थानची भव्यता आणि सौंदर्याची ग्वाही देतात 'हे' किल्ले... By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 03:35 PM2019-06-01T15:35:17+5:302019-06-01T15:41:12+5:30Join usJoin usNext राजस्थानची ओळख म्हणजे, तेथील भव्य किल्ले. जर तुम्हाला ऐतिहासिक वास्तूंचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी राजस्थानला भेट द्या. मेहरानगढचा किल्ला (जोधपूर) राजस्थानमधील हा किल्ला राव जोधाज्वारे 1459मध्ये तयार करण्यात आला होता. मोती महाल, ज्याला पर्ल पॅलेसच्या रूपात ओळखलं जातं. ही किल्ल्याची सर्वात मोठी खोली आहे. चित्तोडगढचा किल्ला चित्तोडगढचा किल्ला, एक भव्य आणि सुंदर संरचना आहे. जो तेथील इतिहासाची साक्ष देतो. हे शहरातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक सरळ चढण आणि वळणदार रस्त्यावरून एक मैलभर चालावं लागेल. आमेर फोर्ट (जयपूर) आमेर फोर्टला जवळपास 200 वर्षांपूर्वी राजा मानसिंह, मिर्जा राजा जय सिंह आणि सवाई जय सिंहद्वारे तयार करण्यात आला होता. किल्ला मूठा तलावाच्या किनाऱ्यावर स्थित आहे. यामध्ये महाल, मंडप, हॉल, मंदिर आणि बगीचे आहेत. भटनेरचा किल्ला (हनुमानगढ) भारतातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक असलेला भटनेरचा किल्ला पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. हा किल्ला जवळपास 1700 वर्ष जुना आहे. राजा भूपत यांनी हा किल्ला तयार केला होता. गागर नदीच्या किनाऱ्यावर तयार करण्यात आलेला हा किल्ला हनुमानगढ फोर्टच्या नावाने ओळखला जातो. जैसलमेर किल्ला (जैसलमेर) शहराच्या केंद्रामध्ये असलेला जैसलमेर किल्ल्याला जैसलमेरची शान म्हणून ओळखलं जातं. याला 'सोनार किल्ला' किंवा 'स्वर्ण किल्ला' असं म्हटलं जातं. दरम्यान, हा किल्ला पिवळ्या बलुआ दगडाने तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी हा सोन्याप्रमाणे चमकतो. कुम्भलगढ किल्ला (राजसमंद) राजस्थानमधील दुसरा महत्त्वाचा किल्ला म्हणजे, कुम्भलगढ किल्ला. हा किल्ला पंधराव्या शतकामध्ये राजा कुम्भाने बांधला होता. यामध्ये महाराणा फतेह सिंहद्वारे निर्मित करण्यात आलेलं गुंबददार महालदेखील आहे. रणथंभौरचा किल्ला (सवाई माधोपूर) रणथंभौरचा किल्ला सर्वात शक्तीशाली किल्ला म्हणून ओळखला जातो. किल्ल्यामध्ये विभिन्न हिंदू आणि जैन मंदिरासोबत एक मशीददेखील आहे. किल्ला विंध्य पठार आणि अरावली डोंगरांच्या मध्यभागी स्थित आहे. जो 7 किलोमीटर क्षेत्रफळामध्ये पसरलेला आहे. तारागढचा किल्ला (अजमेर) तारागढचा किल्ला 'स्टार फोर्ट'च्या नावाने प्रसिद्ध आहे. हा किल्ला शहरातील मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. हा किल्ला 1354मध्ये तयार करण्यात आला होता. या किल्ल्यावर पाण्याचे तीन तलावदेखील आहेत. मुख्य म्हणजे हे तलाव कधीच सुकत नाहीत. टॅग्स :राजस्थानट्रॅव्हल टिप्सभारतपर्यटनRajasthanTravel TipsIndiatourism