There are three 'special' places for tourism in the Leh-Ladakh region of India
भारतातल्या लेह-लडाख प्रदेशातील पर्यटनासाठी 'या' तीन जागा आहेत खास By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 06:50 PM2019-08-08T18:50:04+5:302019-08-08T18:55:32+5:30Join usJoin usNext निसर्गरम्य वातावरणात मित्रांबरोबर सुट्टी एन्जॉय करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. अशा पर्यटनस्थळांमध्ये जम्मू-काश्मीर आणि लेह-लडाखसारखी ठिकाणं फिरण्यासाठी खास आहेत. लडाखमधलं थिस्की हे ठिकाणही मित्रांबरोबर सुट्टी घालवण्यासाठी भारी आहे. मित्रांसोबत कँपिंग आणि ट्रेकिंग करण्यासाठी ही जागा बेस्ट आहे. इथे जाण्यासाठी सर्वात चांगलं चंबा हे कॅम्प आहे. जे हिमाचलच्या मधोमध स्थित आहे. इथे राफ्टिंग, सायकलिंग आणि पोलो खेळणं, पाहण्याचा आनंद लुटू शकता. हे लेह लडाखमधल्या सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. जान्स्कर व्हॅली- लेह-लडाखच्या पर्वतरांगामध्ये सर्वात सुंदर ठिकाण जान्स्कर व्हॅली आहे. ही जम्मूतल्या सर्वात उंच पर्वतावर स्थित आहे. इथे कॅम्पिंगसाठी जून ते सप्टेंबरपर्यंत जाणं ठीक आहे. थंडीच्या मोसमात ही ट्रॅक करण्याची मजा काही औरच असते. थंडीच्या दिवसात इथली नदी गोठते, त्याच्या ठिकाणी ट्रेकिंग केलं जातं. या ट्रॅकिंगला चादर ट्रॅकही म्हटलं जातं. सिंधू नदी- इतिहासात सिंधू नदीचा उल्लेख पाहिलाच आहे. पण इथे जाऊन एकदा फिरूनही नक्की या. लेह-लडाखच्या सर्वात सुंदर घाटीमध्ये सिंधू नदी प्राकृतिक सुंदरता आणि आश्चर्यजनक दृश्यांसाठी चांगल्या कॅम्पेनिंगची जागा आहे. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सTravel Tips