These 5 countries are special for tourism
पर्यटनासाठी हे 5 देश आहेत खास, फिरा बिनधास्त By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 11:48 PM2019-05-14T23:48:22+5:302019-05-14T23:51:19+5:30Join usJoin usNext लग्न केल्यानंतर बऱ्याचदा हनिमूनचे प्लॅन ठरवले जातात. हनिमूनसाठीही बेस्ट डेस्टिनेशन निवडण्याचा मग खटाटोप सुरू होतो. असे पाच देश आहेत जे फिरण्यासाठी जबरदस्त आहेत. बाली हा जगभरात सुंदर देशांपैकी एक असून, इथे विस्तीर्ण असा समुद्रकिनारा आहे. विवाहित जोडप्यांना हा समुद्रकिनारा सदोदित आकर्षित करतो. मालदीव हा देशही फिरण्यासाठी स्वस्त आहे. मालदीवमध्ये जगभरातले नयनरम्य समुद्र किनारे आहेत. इथे प्रवास करणं खूपच स्वस्त आहे. ग्रीस नाव ऐकल्यानंतर नजरेसमोर ऐतिहासिक वारसा लाभलेली ठिकाणं दिसतात. इथे संतोरिनी आणि अँथेन्स सारखे प्रसिद्ध आयलंड आहेत. मेपासून ऑक्टोबरपासून हे फिरण्यासाठी ठिकाण बेस्ट आहे. थायलंडमधलं क्राबीसुद्धा नवविवाहीत जोडप्यासाठी खास आहे. जगभरात हे ठिकाण अनेकांच्या पसंतीचं आहे. क्राबी 130 निर्जन आणि शांत असलेल्या द्वीपकल्पाचा समूह आहे. इथे निसर्गाचं अद्भुत सौंदर्य पाहायला मिळतं. मॉरिशसमध्येही आपल्या जीवनाची सुरुवात सुंदर नजाऱ्यांनी होते. मॉरिशस हनिमूनसाठी बेस्ट पर्याय आहे. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सपर्यटनथायलंडTravel TipstourismThailand