top most luxurious cruise ships in the world
शानदार! जबरदस्त!! ही आहेत जगातील सर्वात आलिशान जहाजं By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 6:46 PM1 / 6हार्मोनी ऑफ द सीज ही जगातील सर्वात मोठी क्रूझ आहे. या क्रूझची लांबी 363 मीटर इतकी आहे. या क्रूझची प्रवासी क्षमता तब्बल 5979 इतकी आहे. विशेष म्हणजे 2016 नंतर या क्रूझनं समुद्र प्रवास केलेला नाही. मात्र तरीही ही क्रूझ जगातील सर्वात आलिशान क्रूझ आहे. 2 / 6ऍल्युर ऑफ द सीज- ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची क्रूझ आहे. 2010 मध्ये या क्रूझचं जलावतरण झाले. यामधून 5400 प्रवासी करू शकतात. यामध्ये डान्स हॉल, चित्रपटगृह, आईस स्केटिंगसह फिटनेस रुम अशा अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत. 3 / 6ओऍसिस ऑफ द सीज- जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या या क्रूझची लांबी 362 मीटर इतकी आहे. या क्रूझमध्ये 16 विभाग आहेत. यामध्ये ऍक्वा थिएटर, रॉक क्लाईम्बिंग, फुटबॉल कोर्ट, व्हॉलिबॉल कोर्ट आणि स्विमिंग पूल यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. 4 / 6क्वॉन्टम ऑफ द सीज- शांघाय ते कोरिया आणि जपान असा प्रवास करणाऱ्या या जहाजाची उभारणी 2014 मध्ये करण्यात आली. या क्रूझची क्षमता 4180 इतकी आहे. या क्रूझची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. या क्रूझमधील रुममधून समुद्राचा नयनरम्य नजारा दिसतो. 5 / 6अँथम ऑफ द सीज- फेब्रुवारी 2015 मध्ये या क्रूझची बांधणी पूर्ण झाली. ही क्रूझ 22 नॉट्सचा वेग अगदी आरामात गाठते. या क्रूझवर एकूण विभाग आहेत. या जहाजातून 4905 प्रवासी एकाचवेळी प्रवास करू शकतात. यामध्ये 1570 खोल्या आहेत. 6 / 6ओव्हेशन ऑफ द सीज- 2016 मध्ये या जहाजाचं जलावतरण झालं. अवघ्या काही महिन्यात या क्रूझची गणना टॉप 10 क्रूझमध्ये होऊ लागली. ही क्रूझ जवळपास 348 मीटर लांब आहे. 4 हजार 905 इतकी या क्रूझची क्षमता आहे. या क्रूझमध्ये वॉटर पार्क, कसिनोसारख्या सुखसोयी उपलब्ध आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications