शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फिरण्याची आवड आहे? मग 'या' गोष्टी ठेवा बॅगेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 2:02 PM

1 / 6
रोजच्या धकाधकीतून विरंगुळा म्हणून फिरण्याचे बेत आखले जातात. बाहेर फिरायला जाताना स्वत:ची काळजी घेणं गरजेचं असतं. फिरण्याची आवड असेल तर कोणत्या गोष्टी बॅगेत ठेवायच्या हे जाणून घेऊया.
2 / 6
गाणी ऐकायला सर्वांनाच आवडतात. त्यामुळे ब्लूटूथ स्पीकर जवळ ठेवा. बोन फायर आणि नाईट कँप दरम्यान ब्लूटूथ स्पीकर फायदेशीर ठरतात.
3 / 6
फिरताना फोटो काढणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. गिंबलचा वापर हा व्हिडीओ काढण्यासाठी केला जातो. गिंबलच्या मदतीने उत्तम फोटो काढू शकता.
4 / 6
फोल्डेबल डफल बॅग नेहमीसोबत ठेवा. अनेकदा प्रवासादरम्यान आपण शॉपिंग करतो. त्यावेळी ते सामान ठेवण्यासाठी बॅगचा उपयोग होतो.
5 / 6
पर्सनलाइज्ड लगेज टॅग्स असणं गरजेचं आहे. कारण अनेकदा प्रवासादरम्यान बॅग हरवण्याची शक्यता असते. तसेच खूप जास्त सामान असल्यास आपली बॅग ओळखण्यासाठी पर्सनलाइज्ड लगेज टॅग्स फायदेशीर ठरतात.
6 / 6
फिरण्याचा छंद असेल तर नेहमी नेक पिलो सोबत ठेवा. यामुळे मान आणि पाठ दुखणार नाही. तसेच प्रवासादरम्यान त्याचा फायदा होईल.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स