Trekking in the 'place' of rainy season!
पावसाळ्यात 'या' ठिकाणी करा ट्रेकिंग! By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 03:24 PM2019-07-15T15:24:20+5:302019-07-15T15:37:23+5:30Join usJoin usNext भारतात फिरण्यासाठी किंवा ट्रेकिंगसाठी अनेक ठिकाणे आहेत. डोंगर, समुद्र, वाळवंट अशा ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर मग हवामानाचा अंदाज पाहून करु शकता. सध्या पावसाने दमदार सुरूवात केली आहे. पावसाळ्यात तुम्ही ट्रेकिंगचा विचार करत असाल तर खाली दिलेल्या ठिकाणी जाऊन तुम्ही अनुभव घेऊ शकता. हर की दून : उत्तराखंडातील हर की दून पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी गोविंद नॅशनल पार्कमधून जावे लागते. येथे फेरफटका मारताना पाइनचे जंगल, ग्लेश्यिर आणि लहान खेड्यांचा अनुभव घेता येईल. पिन भाबा पास : किन्नौरपासून सुरु होणारी ही ट्रेकिंग करण्यास खूप मजा येते. घनदाड जंगल आणि डेजर्ट पिन व्हॅलीचे नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येतील. चंद्रशिला ट्रॅक : चंद्रशिला असे एक ट्रेकिंगचे ठिकाण आहे, जे पर्यटकांच्या आवडीचे आहे. या ठिकाणाहून उत्तराखंडच्या पूर्व आणि पश्चिमेकडील संपूर्ण भाग दिसून येतो. या ठिकाणी ट्रेकिंग केल्यास एक वेगळाचा अनुभव मिळेल. रूपिन पास : लँडस्केपसाठी रूपिन पास ओळखले जाते. तसेच, ट्रेकिंगसाठी अट्रॅक्शन पाईंट आहे. याठिकाणी वाहत्या नदीचे पानी, झरे, हिरवेगार मैदान पाहून पर्यटकांसह ट्रेकिंग करणाऱ्यांना आवडेल. हम्प्टा पास : पावसाळ्यात हिमाचलमधील हम्प्टा पास ट्रेकिंगसाठी बेस्ट पर्याय आहे. हम्प्टा पास ट्रेकिंग आपल्याला लाहौल स्पीतिच्या सुंदर चंद्र घाटीपर्यंत घेऊन जाईल.टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सTravel Tips