वाकडमध्ये खरेदी खत करण्याच्या बहाण्याने १ कोटी ८५ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 03:07 PM2022-08-20T15:07:13+5:302022-08-20T15:07:28+5:30
आरोपींवर गुन्हा दाखल...
पिंपरी : विकत घेतलेल्या प्लॅटचे खरेदी खत नसल्याने ते करून देण्याच्या बहाण्याने प्लॅटवर बँकेचे कर्ज घेऊन एक जणाची तब्बल १ कोटी ८५ लाखांची फसवणुक केली. ही घटना २०१७ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत वाकड येथे घडली.
या प्रकरणी लखमशी कांजीभाई पटेल (वय ७३, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी चैतन्य कालबाग (वय ६०, अंंधेरी. मुंबई), दीपक शिवशरण प्रजापती (वय ४६, मुंबई) यांच्यासह एका महिला आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या मुलाचा विस्टा इम्प्रेस, वाकड येथे फ्लॅट होता. या प्लॅटचे खरेदीत खत फिर्यादी यांच्या नावावर नव्हते. त्यामुळे आरोपींनी खरेदीखत करून देण्याच्या बहाण्याने प्लॅट बँकेकडे गहाण ठेवून दोन कोटीचे कर्ज घेतले आणि फिर्यादी आणि फिर्यादीच्या मुलाची १ कोटी ८५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.