पिंपरी : कोरोनाचा विळखा वाढू लागला असून चिंचवड येथील एका सोसायटीत ११ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे परिसर सील केला आहे. पहिला मायक्रो कंटन्मेट झोन करण्यात आले आहे.
कोरोनाचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत कमी झालेला कोरोना आता फेब्रुवारीच्या दुसºया आठवड्यात कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. चिंचवड परिसरातील शंभर सदनिकांची सोसायटी असून त्या ठिकाणी एका नागरिकाला कोरोना झाला होता. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी केली असता आज अकरा जण पॉझिटिव्ह आले आहेत. यानंतर आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पवन साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी सायंकाळी या भागाची पाहणी केली. परिसर सील केला आहे. तसेच तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची कॉन्टक्ट ट्रेसिंग करण्याचे काम सुरू केले आहे.आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पवन साळवे म्हणाले, ‘‘गेल्या पाच दिवसात ज्या परिसरात अधिक रुग्ण आढळले त्या परिसराची पाहणी करण्यात येत आहे. अशीच एक साडेचारशे सदस्यांची एक सोसायटी आज सील केली आहे. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. नियमांचे पालन करावे. ’’