फेरीवाल्यांसाठी २४६ जागा निश्चित, जानेवारीअखेर मिळणार ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:24 AM2018-01-23T06:24:33+5:302018-01-23T06:24:48+5:30

सर्वाेच्य न्यायालयाच्या सूचनेनुसार फेरीवाला धोरण करावे, जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश दिल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्वेक्षण केले होते. शहरातील नोंदणीकृत फेरिवाल्यांना व्यावसायासाठी २४६ ठिकाणच्या जागा अधिकृतरित्या देण्यात येणार आहेत. जानेवारीअखेर त्यांना जागा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

 246 seats for hawkers, fixed by the end of January | फेरीवाल्यांसाठी २४६ जागा निश्चित, जानेवारीअखेर मिळणार ताबा

फेरीवाल्यांसाठी २४६ जागा निश्चित, जानेवारीअखेर मिळणार ताबा

googlenewsNext

पिंपरी : सर्वाेच्य न्यायालयाच्या सूचनेनुसार फेरीवाला धोरण करावे, जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश दिल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्वेक्षण केले होते. शहरातील नोंदणीकृत फेरिवाल्यांना व्यावसायासाठी २४६ ठिकाणच्या जागा अधिकृतरित्या देण्यात येणार आहेत. जानेवारीअखेर त्यांना जागा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
फेरीवाला धोरण महापालिकेने आखले असून नोंदणीकृत फेरीवाल्यांना जागा देण्यासंदर्भात सोमवारी पालिकेत बैठक झाली. या बैठकीला महापौर नितीन काळजे, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, भुमी जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे, सर्व प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी उपस्थित होते.
याविषयी सभागृहनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘न्यायलयाच्या सूचनेनुसार शहरातील फेरीवाल्यांचे २०१४ मध्ये सर्वेक्षण झाले आहे. त्यानुसार पाच हजार नऊशे नोंदणीकृत फेरीवाले आहेत. या फेरीवाल्यांना व्यावसायासाठी शहरातील २४६ ठिकाणच्या जागा देण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रभागात किती फेरीवाले बसविता येतील. याचा सर्व्हे करण्यात येणार आहे. एका प्रभागात किती फेरीवाले बसू शकतात.
एका फेरीवाल्याला किती जागा लागू शकते, याचा सर्वे करण्याच्या सूचना क्षेत्रिय अधिका-यांना दिल्या आहेत. जानेवारीअखेर नोंदणीकृत फेरीवाल्यांना जागा देण्यात
येणार आहे.’’
अनधिकृतवर कारवाई-
पिंपरी-चिंचवड शहाराच्या सौदर्यांला बाधा पोहचविणा-या? अनधिकृत फेरीवाल्यांवर दिवसांतून दोनवेळा कार्यवाही करावी, अशा सूचना पदाधिका-यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या वेळी बैठकीत राष्ट्रीयफेरीवाला धोरणांतर्गत महापालिका हददीतील क्षेत्रिय कार्यालय निहाय फेरीवाल्यांची संख्या, बायोमेट्रीक सर्वेक्षण झालेल्या प्रात्र फेरीवाल्यांची संख्या क्षेत्रिय कार्यालय निहाय निश्चीत केलेल्या झोनची संख्या आदी विषयांवर चर्चा झाली.

Web Title:  246 seats for hawkers, fixed by the end of January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.