पिंपरीत घरफोडीचे सत्र ; ८ मोबाईल चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 04:50 PM2020-02-02T16:50:58+5:302020-02-02T16:53:07+5:30
उद्योगनगरीतील वाहनचोरीचे सत्र थांबत नसतानाच मोबाइल फोन चोरीचे प्रकार वाढत आहेत. घरफोडी करून तसेच उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून मोबाइल फोन चोरून नेले जात आहेत.
पिंपरी : उद्योगनगरीतील वाहनचोरीचे सत्र थांबत नसतानाच मोबाइल फोन चोरीचे प्रकार वाढत आहेत. घरफोडी करून तसेच उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून मोबाइल फोन चोरून नेले जात आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून ९० हजारांचे आठ मोबाइल चोरीला गेल्याप्रकरणी शनिवारी (दि. १) विविध पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मोबाइल चोरीचा पहिला प्रकार पांढरकवस्ती, आकुर्डी येथे मंगळवारी (दि. २८) रात्री साडेबारा ते अडीचच्या दरम्यान घडला. याप्रकरणी संदीप गणेश पंडीत (वय ३५, रा. पांढरकर वस्ती, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फि र्यादी पंडीत यांचे घर बंद असताना चोरट्याने कशाच्या तरी साह्याने घराचा दरवाजा उघडला. घरात प्रवेश करून घरातील ३६ हजार रुपये किमतीचे चार मोबाइल चोरी करून नेले.
मोबाइल चोरीचा दुसरा प्रकार चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे शनिवारी (दि. १) पहाटे साडेपाच ते दुपारी पावणे चारच्या दरम्यान घडला. याप्रकरणी अमोल जिजाराम रोकडे (वय २५, रा. संत ज्ञानेश्वर नगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी रोकडे कामास गेले होते. त्यावेळी त्यांनी रुममध्ये ठेवलेली कपड्याची सॅक व त्यात ठेवलेले कागदपत्रे तसेच ४१ हजार रुपये किमतीचे मोबाइल फोन व फिर्यादी यांचा रुम पार्टनर अंकुश रत्नपारखे यांचा मोबाइल फोन चोरट्याने चोरून नेले.
मोबाइल चोरीचा तिसरा प्रकार मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे ५ जानेवारी रोजी दुपारी अडीच ते चारच्या दरम्यान घडला. याप्रकरणी सनी व्यारा शर्मा (वय २३, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी घरात झोपलेले असताना चोरट्याने दरवाजा ढकलून घरात प्रवेश केला. घरातील सात हजार रुपये कमितीचा मोबाइल चोरून नेला.मोबाइल चोरीचा चौथ प्रकार नवलाख उंब्रे येथे २९ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. याप्रकरणी मोहम्मद सय्यद राजा (वय २४, रा. नवलाख उंबे्र) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी राजा घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने पाच हजारांचा मोबाइल चोरून नेला.