पिंपरी : किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. यात शिवीगाळ करून मारहाण केली. बावधन येथील भुंडे वस्तीत मंगळवारी (दि. १०) सकाळी पावणे सात ते साडेसात या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
पहिल्या प्रकरणात रोहित अनिल रजपूत (३०, रा. भुडे वस्ती, बावधन) यांनी फिर्याद दिली. राजेंद्र राजपूत, उनेश राजपूत, अरविंद राजपूत आणि तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. फिर्यादी रोहित यांचा कामगार कामावर जात असताना संशयितानी त्याला शिवीगाळ करून काठीने मारण्याची धमकी दिली. त्याचा जाब फिर्यादी यांनी विचारला असता संशयितांनी फिर्यादी रोहित, त्यांचे कुटुंबीय आणि कामगाराला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. संशयित महिलेने फिर्यादी रोहित यांच्या आईच्या पायावर दगड मारून त्यांना जखमी केले.
याच्या परस्परविरोधात ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली. रोहित अनिल राजपूत, कुनाल राजपूत, राहुल राजपूत, राेहित राजपूत यांचा कामगार आणि चार महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रोहित राजपूत याचा कामगाराने दुचाकीवरून येऊन फिर्यादी महिलेच्या घरासमोर दुचाकीचा हाॅर्न वाजवला. त्याचा जाब विचारला असता कामगाराने शिवीगाळ केली. राहुल राजपूत याने रस्त्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादी महिलेच्या आईच्या कपाळावर मारून जखमी केले. तसेच फिर्यादी महिलेला मारहाण केली.