अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 02:52 AM2018-06-03T02:52:23+5:302018-06-03T02:52:23+5:30

महाराष्टÑ राज्य मंडळ (एसएससी बोर्ड) व्यतिरिक्त सीबीएसई, आयसीएसई, आयजी, एनआयओएस, आजीएससीई आदी इतर बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे.

 Access process for eleventh; Facilitation forms are available | अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध

अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध

googlenewsNext

पिंपरी : महाराष्टÑ राज्य मंडळ (एसएससी बोर्ड) व्यतिरिक्त सीबीएसई, आयसीएसई, आयजी, एनआयओएस, आजीएससीई आदी इतर बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येक झोननिहाय मार्गदर्शन केंद्रामध्ये आॅनलाइन अर्ज भरण्याची व तपासून घेण्याची (अ‍ॅप्रूव्ह) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील ११ वी प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने आॅनलाइन राबविण्यात येते. एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा त्यांच्या शाळांमध्ये उपलब्ध केली आहे. त्याव्यतिरिक्त इतर बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शहरात ९ मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून दिली आहेत. तिथे आॅनलाइन अर्ज भरण्याची व तपासून घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
गुजराथी हायस्कूल (फडके हौद), कलमाडी हायस्कूल (एरंडवणे), राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल (सहकारनगर), सिंहगड कॉलेज (सिंहगड रोड), सेंट मीराज कॉलेज फॉर गर्ल्स (कोरेगाव पार्क रोड), आबेदा इनामदार कॉलेज (आझम कॅम्पस, कॅम्प), सेंट पॅट्रिक्स कॉलेज (एम्प्रसे गार्डनजवळ), सिंबायोसिस कॉलेज (सेनापती बापट रोड), भारतीय जैन संघटना कॉलेज (वायसीएम हॉस्पिटल जवळ, पिंपरी), एनएनबीपी हायस्कूल (रहाटणी, पिंपरी), प्रेरणा उच्च माध्यमिक विद्यालय (निगडी प्राधिकरण) आदी मार्गदर्शन केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.
सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांचे मुख्य ५ विषयांचे (इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र व द्वितीय भाषा) गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. या व्यतिरिक्त विषयांचा विचार केला जाणार नाही.

- आयजीएससीई, आयबी, आयजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपत्रकावरील विषयानुसार सर्व विषयाचे गुण एकत्रित घेऊन नंतर ते ५०० गुणांमध्ये रूपांतरीत केले जातील. या विद्यार्थ्यांना बेस्ट आॅफ फाईव्ह निवडता येणार नाही. तसेच कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डाव्यतिरिक्त शालेय पातळीवरील परीक्षा उत्तीर्ण असल्यास असे विद्यार्थी या प्रवेशप्रक्रियेसाठी अपात्र समजण्यात येतील, असे केंद्रीय प्रवेश समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title:  Access process for eleventh; Facilitation forms are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.