प्रशासकीय यंत्रणा मतदानासाठी सज्ज

By admin | Published: August 18, 2015 11:56 PM2015-08-18T23:56:18+5:302015-08-18T23:56:18+5:30

कामशेत ग्रामपंचायत निवडणुकीतील ७ मतदान केंद्रावर बुधवारी सकाळपासून मतदान होणार आहे. २९६९ पुरुष व २६७७ स्त्री एकुण ५,६४६ नागरिक

The administrative machinery is ready for voting | प्रशासकीय यंत्रणा मतदानासाठी सज्ज

प्रशासकीय यंत्रणा मतदानासाठी सज्ज

Next

 वडगाव मावळ : कामशेत ग्रामपंचायत निवडणुकीतील ७ मतदान केंद्रावर बुधवारी सकाळपासून मतदान होणार आहे. २९६९ पुरुष व २६७७ स्त्री एकुण ५,६४६ नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी ४६ कर्मचारी नियुक्त केले आहे.
मावळ तहसील महसुल भवन येथे मतदान इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन व इतर साहित्यांचे वाटप दुपारी दोनला केले. संवेदनशील मतदान केंद्र घोषित केले असुन कामशेतमध्ये १३६ सशस्त्र पोलीस तैनात करुन कडक बंदोबस्त ठेवल्याने छावणीने स्वरुप आले असुन दि. १९ व २० आॅगस्टला जमाव बंदी आदेश लागु झाला आहे.
मतदारांनी कुठल्याही अफवा दबावाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडण्याचे आवाहन पोलीस उप अधीक्षक विनायक ढाकणे यांनी
केले. गुरुवारी सकाळी १० ला मत मोजणी होणार असुन दि. १९ व २० आॅगस्ट रोजी जमाव बंदी आदेश लागू केला आहे. मतदारांनी कुठल्याही अफवा दबावाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडण्याचे आवाहन तहसीलदार शरद पाटील यांनी केले.
कामशेत ग्रामपंचायत निवडणुकीच्या पंडित नेहरु विद्यालयातील ३ मतदान केंद्रात दि. ४ आॅगस्ट रोजी १०५३ पुरुष व १०५२ स्त्री एकुण २१०५ मतदारांनी मतदान केले. असुन बुधवारी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान करण्यात येणार आहे. (वार्ताहर)

Web Title: The administrative machinery is ready for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.