वडगाव मावळ : टाकवे दुर्घटनेतील तरुणांचे मृतदेह अखेर नऊ दिवसांनी सापडला. टाकवे गावच्या हद्दीतील इंद्रायणीनदीवरच्या पुलाचा कठडा तोडून कारनदीपात्रात पडली होती. कारमधील तीन जणांपैकी अक्षय ढगे हा पोहून बाहेर आला. तर दोघे नदीत बुडाले.त्यातील संकेत असवले याचा मृतदेह कारमध्ये मिळाला. ही घटना १ ऑगस्ट रोजी घडली होती. पावसामुळे शोध कार्य थांबवले होते.सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून बोट देण्यात आली. मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीमला आज (शुक्रवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास इंद्रायणी नदीत घटनास्थळापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर अक्षय जगताप या तरुणाचा मृतदेह सापडला.
स्विफ्ट डिझायर कारमधून अक्षय ढगे, संकेत असवले, आणि अक्षय जगताप हे तिघेजण गुरुवारी (दि. 1) दुपारी एकच्या सुमारास कान्हे फाट्याकडून टाकवे गावाकडे जात होते. संकेत असवले हा कार चालवत होता. इंद्रायणी पुलावरचे खड्डे चुकवताना नदीवरील पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात पडली. टाकवे बु. गावातील नागरिकांनी मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीला अक्षयचा मृतदेह शोधण्याची विनंती केली. गावक-यांनी टीमच्या राहण्याची व्यवस्था देखील केली. गावक-यांची तळमळ बघून टीमने अक्षयचा मृतदेह शोधण्यासाठी आणखी कसोशीने प्रयत्न केले. या प्रयत्नांना नऊ दिवसानंतर यश आले.पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी मृत देह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
एका मित्राचा आज अंत्यविधी तर दुस-या मित्राचा उद्या दशक्रियाविधी; टाकवे गावावर शोककळाकार नदीत पडल्याच्या अपघातात अक्षय आणि संकेत या दोघांचा मृत्यू झाला. संकेतचा मृतदेह अपघाताच्या दिवशीच कार सोबत पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मात्र, अक्षयचा मृतदेह सापडला नाही. अखेर नऊ दिवसानंतर अक्षयचा मृतदेह सापडला. आज (शुक्रवारी) अक्षयचा अंत्यविधी होणार आहे. तर त्याचा मित्र संकेतचा दशक्रिया विधी उद्या (शनीवारी) होणार आहे. या दु:खद प्रसंगामुळे संपूर्ण टाकवे गाव आणि पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.)