पिंपरी : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शहरात आले होते. मुलगा पार्थ च्या अपयशाबद्दल अजित पवार म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघातून मुलगा पार्थ याच्या पराभवाचा पवार कुटूंबियांना कोणताही धक्का बसला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पडलेल्या उमेदवाराच्या पराभवाचे जेवढे दु:ख झाले. तेवढेच पार्थच्या पराभवाचे दु:ख झाले आहे.
लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार प्रथमच जाहीर कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत. त्यांनी पार्थच्या पराभवावर भाष्य केले.
पार्थचे वडील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस मधील आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून राहतो. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभूत झालेल्या उमेदवारांचे दु:ख वाटले. तेवढेच दु:ख मुलगा पार्थ याच्या पराभवाचे झाले आहे. पक्षाच्या इतर उमेदवारांच्या पराभवासारखाच त्याचा पराभव झाला आहे. पराभवाने तो खचला नाही. ज्याला योग्य वाटेल ते त्याने करावे, याचे आमच्यात स्वातंत्र्य आहे."