पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 08:08 PM2019-11-19T20:08:59+5:302019-11-19T20:17:15+5:30
समन्यायी पाणी वाटप आणि अपूऱ्या पाणीपुवठ्यावर पर्याय शोधणे, गळती, पाणी चोरी रोखण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीपुरवठा विभागास दोन महिन्यांची मुदत दिली आहे.
पिंपरी : समन्यायी पाणी वाटप आणि अपूऱ्या पाणीपुवठ्यावर पर्याय शोधणे, गळती, पाणी चोरी रोखण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीपुरवठा विभागास दोन महिन्यांची मुदत दिली आहे. येत्या सोमवारपासून शहरात पूर्णदाबाने दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असून हा बदल दोन महिने राहणार आहे. ‘पाणीचोरी आळा, पाणीपुरवठ्यात सुधारणा न झाल्यास दोषी अधिकाºयांवर कडक कारवाई केली जाणार आहे. टँकर माफीयांवर गन्हे दाखल केले जाणार आहेत, असा इशारा हर्डीकर यांनी दिला आहे.
पवना धरण शंभर टक्के भरले असतानाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पिंपरी-चिंचवड शहरात गंभीर बनला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रशासनावर टीका केली जात आहे. ‘टँकर माफीयांवर कारवाई, बांधकामांना पाणी बंदी अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली होती. तर पाणी टंचाईस प्रशासन कारणीभूत असून यापुढे पाणीप्रश्नावर महापालिकेत येणार नाही, अशी भूमिका खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली होती. याबाबत आज आयुक्त दालनात बैठक झाली. यावेळी महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे आदी उपस्थित होते.
हर्डीकर म्हणाले, ‘‘पिंपरी - चिंचवडची लोकसंख्या आजमितीला २७ लाखांच्या आसपास आहे. त्यासाठी पवना धरणातून दररोज ५०० दलघमी पाणी उपसा केला जातो. त्यापैकी ३८ ते ४० पाण्याची गळती होते. ही पाणीगळती कमी करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. शहरात एक लाख ५० हजार नळजोड आहेत. वाढत्या लोकसंख्येचा चिवार करता आजमितीला ६०० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. समन्यायी पाणीवाटपासाठी चोवीस तास अखंड पाणीपुरवठा करणे, पाणीवितरण व्यवस्था मजबूत करणे, नळजोड बदलणे, जलवुंष्ठभ बांधणे आदी कामे सुरु आहेत. वाढती लोकसंख्या आणि ४० टक्के पाणीगळती विचारात घेता सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पाण्याच्या दाबात वाढ होऊन तक्रारींचे प्रमाण कमी होईल.’’