‘श्रावण परी’साठी सखींचे आॅडिशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:26 AM2018-08-18T00:26:27+5:302018-08-18T00:26:51+5:30
लोकमत सखीमंच, मोरया स्कूल आॅफ परफॉर्मिंग आर्ट्स व क्लिओपात्रा ब्राईडल स्टुडिओ आणि ब्युटी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १९) श्रावण परी कार्यक्रमासाठी आॅडिशन घेण्यात येणार आहेत.
पिंपरी - लोकमत सखीमंच, मोरया स्कूल आॅफ परफॉर्मिंग आर्ट्स व क्लिओपात्रा ब्राईडल स्टुडिओ आणि ब्युटी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १९) श्रावण परी कार्यक्रमासाठी आॅडिशन घेण्यात येणार आहेत.
लोकमत सखीमंच सदस्या व सर्व महिलांसाठी हे आॅडिशन खुले असणार आहे. आॅडिशनसाठी लहान मुली, युवती, महिला सहभागी होऊ शकतात. या आॅडिशनमध्ये वॉक व परिचय होणार आहे. स्पर्धकांनी दिलेल्या परिचयावरून त्यांची निवड केली जाणार आहे.
श्रावण महिन्यामध्ये विविध सण साजरे केले जातात. धार्मिकदृष्ट्या हा महिना अतिशय पवित्र मानला जातो. सण-उत्सवांच्या काळामध्ये महिला अनेक पारंपरिक खेळ खेळत असतात. या पारंपरिक खेळांच्या जोडीला महिलांना मॉडर्न स्पर्धेचाही आनंद घेता यावा हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तसेच महिलांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामधून त्यांना विविध प्रकारच्या स्पर्धेचा आनंद घेता यावा व त्यातून नव-नवीन गोष्टी शिकण्यास मिळव्यात यासाठी लोकमत हा उपक्रम राबवणार आहे.
या मध्ये निवड झालेल्या स्पर्धकांची सेमिफायनल सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. आॅडिशन स्थळ मोरया स्कूल आॅफ आर्ट्स, तानाजी नगर, लिंक रोड चिंचवड येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी व आॅडिशनसाठी संपर्क : ९८२३१६९८५०.