Video : कुत्र्याला मारायला गेला लाथ अन्‌ रिक्षाचा झाला अपघात; सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 10:48 PM2021-05-17T22:48:44+5:302021-05-18T09:51:15+5:30

या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. त्याचे फुटेज शनिवारी रात्री सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

A auto rickshaw driver accident from kick to a dog ; CCTV footage goes viral on social media | Video : कुत्र्याला मारायला गेला लाथ अन्‌ रिक्षाचा झाला अपघात; सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल

Video : कुत्र्याला मारायला गेला लाथ अन्‌ रिक्षाचा झाला अपघात; सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल

googlenewsNext

पिंपरी : भरधाव रिक्षाच्या चालकाने रस्त्यात थांबलेल्या कुत्र्याला लाथ मारायचा प्रयत्न केला आणि त्याचा रिक्षावरील ताबा सुटला. त्यामुळे रिक्षा दुभाजकावर चढली. यात चालक रिक्षातून रस्त्यावर पडला आणि रिक्षा चक्क दुभाजकावर धावली.

सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचा हा व्हिडीओ पिंपरी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी कॅम्पातील कराची चौक ते डिलक्स चौकादरम्यान हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार शगुन चौकातून डिलक्स चौकाकडे भरधाव जात असलेल्या रिक्षाचालकाने रस्त्यात थांबलेल्या कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न केला. भांबावलेल्या कुत्र्याने भुंकायला सुरवात केली. त्यामुळे रिक्षातील चालक घाबरला आणि रिक्षावरील त्याचा ताबा सुटला. यात रिक्षा तेथील दुभाजकावर चढली. त्यामुळे चालक रिक्षातून रस्त्यावर पडला. त्यानंतरही रिक्षा दुभाजकावर धावून रस्त्याच्या दुस-या बाजूला गेली. त्यावेळी काही जणांनी सतर्कता दाखवत रिक्षाला थांबवले. त्यावेळी सुदैवाने विरुद्ध दिशेने वाहन येत नव्हते. त्यामुळे रिक्षाची इतर कोणत्याही वाहनाला धडकली नाही. तसेच वेळीच रिक्षाला थांबवल्याने तेथील दुकानांचेही नुकसान टळले.  


घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद
अपघाताची ही घटना काही सीसीटीव्ही कॅमे-यांमध्ये कैद झाली. त्याचे फुटेज शनिवारी रात्री सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. रिक्षाचालकाने केलेल्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचे मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केले. मात्र याबाबत पोलिसांकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. 

अपघात झाल्याची माहिती नाही. तसेच त्याबाबत कोणीही माहिती देण्यासाठी आले नाही. अशा कोणत्याही घटनेची नोंद नाही.
- मिलिंद वाघमारे, वरिष्ठ निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे

Web Title: A auto rickshaw driver accident from kick to a dog ; CCTV footage goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.