पिंपरी : गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी- चिंचवड परिमंडळ एकच्या हद्दीतील १३ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये एमआयडीसी भोसरी, आळंदी, भोसरी व निगडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आरोपींचा समावेश आहे. या गुन्हेगारांना पिंपरी -चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजय अश्रुबा दुनघव (वय २६, रा. बालाजीनगर झोपडपट्टी), शुभम बाळू खरात (वय २३, रा. मोशी), जावेद लालासाहब नदाफ (वय २१, रा. महात्मा फुले नगर झोपडपट्टी, भोसरी), सलमान खाजा काझी (वय २०, रा. आदर्शनगर , मोशी), आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदेश भानुदास पाटोळे (वय २०, रा. सोळू, ता. खेड), शुभम एकनाथ जैद (वय २३, रा. जैद वस्ती, चिंबळी), महेश संजय शिंदे (वय २४, रा. रासे गावठाण), चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओंकार मनोज बिसनारे (वय २१, रा. चाकण), स्वप्निल उर्फ सोप्या संजय शिंदे (वय २८, रा. रासे गावठाण), महेश संजय शिंदे (वय २४, रा. रासे गावठाण), भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वप्निल उर्फ सपन्या सुरेश भोई (वय १९, रा. दापोडी), संतोष सुखदेव माने (वय २३, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांताराम उर्फ टोंग्या उर्फ पप्पू रामचंद्र कांबळे (वय ३२, रा. ओटास्किम, निगडी) अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.
तडीपार करण्यात आलेले सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी परिसरात दहशत पसरवण्यास सुरवात केली होती. त्यामुळे त्यांच्या तडिपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रस्ताव मंजूर करून आरोपींच्या तडिपारीचे आदेश दिले. २०२० मध्ये परिमंडळ एकच्या हद्दीतील ४९ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच माेकाअंतर्गत गुन्हेगारांच्या पाच टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर एमपीडीएअंतर्गत दोन गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.