पिंपरी-चिंचवडच्या दोन्ही महिला पोलीस उपायुक्तांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 08:59 PM2019-07-15T20:59:26+5:302019-07-15T21:02:24+5:30
राज्य व भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त (असंवर्ग) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील व परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांची बदली झाली आहे.
पिंपरी : राज्य व भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त (असंवर्ग) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील व परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांची बदली झाली आहे.
परिमंडळ एक पोलीस उपायुक्तपदी स्मिता अभिषेक पाटील व परिमंडळ दोन पोलीस उपायुक्तपदी सुधीर हिरेमठ यांची नियुक्ती झाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी कार्यान्वित झाले होते. या आयुक्तालयांतर्गत दोन परिमंडळ अस्तित्वात आहेत. दोन्ही परिमंडळांसाठी महिला पोलीस उपायुक्त म्हणून स्मार्तना पाटील व नम्रता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्यातील विविध अधिकाऱ्यांच्या सोमवारी (दि. १५) बदल्या झाल्या.
यात काही अधिकाऱ्यांच्या पदोन्नती देण्यात आली. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील व परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांचा समावेश आहे. स्मार्तना पाटील यांची ठाणे शहरच्या विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी तर नम्रता पाटील यांची राज्य गुप्तवार्ता विभाग, सागरी परिक्षेत्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली झाली आहे.
खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या स्मिता अभिषेक पाटील यांची पिंपरी-चिंचवडच्या परिमंडळ एक पोलीस उपायुक्तपदी वर्णी लागली आहे. सहायक पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय), राज्य पोलीस मुख्यालय, मुंबई येथे कार्यरत असलेले सुधीर हिरेमठ यांची परिमंडळ दोन पोलीस उपायुक्तपदी वर्णी लागली आहे.