अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला दिला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:56 AM2018-04-20T02:56:34+5:302018-04-20T02:56:34+5:30
घरात शिरून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना वाकड परिसरात मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरी : घरात शिरून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना वाकड परिसरात मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवी पाटोळे (वय २१) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोनच्या सुमारास पाटोळे याने पीडित मुलीच्या घराचा दरवाजा ठोठावला. मुलीच्या आईने दरवाजा उघडला. पाटोळे याने आईला ढकलून दिले. घरात अल्पवयीन मुलगी झोपली होती. पाटोळे याने तिच्यासोबत अतिप्रसंग केला. घाबरलेल्या आईने आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारी तत्काळ जमा झाले. पाटोळे
मागील काही दिवसांपासून आपल्या मुलीला त्रास देत असल्याचे शेजाºयांना सांगितले असता त्यांनी पाटोळे याला चांगलाच चोप दिला. त्याला पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.
पोलिसांनी पाटोळे विरोधात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम १८ नुसार गुन्हा नोंदविला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.